रे संभवामि युगे युगे
देतो विस्मय दाखला
सुखदायी जन्माष्टमी
दिधला शब्द राखला
मध्य रात्री काळरात्री
सूर्य प्रकाश फाकला
काळ पण सुखावला
अबीरगुलालेमाखला
कारागृहाच्या भिंतीने
गोपाळकालाचाखला
स्पर्श होता ममत्वाचा
गळूनपडल्या शृंखला
दार खुलले बंदिगृहाचे
काळही क्षणी रूकला
विश्वरक्षक ये जन्माला
सुरक्षारक्षक रे झुकला
दिशासज्ज स्वागताला
डोह यमुनेचा उसळला
दुग्ध जणू वाहे स्तनात
स्नेहमहापूर फेसाळला
पादस्पर्शे शांत उमाळा
प्रवाह तीव्र उच्छृंखला
वाटदिधली वसुदेवाला
वैभवप्राप्त हो चिखला
धन्य धन्य कान्हा जन्म
अगम्यलिला जगताला
जगण्याचे सार्थ सादर
अर्थ उमगला भूमितला
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
2
कान्हा आला ..
बंदिवासात देवकीला
अद्भूत प्रसूति कळा
जगत् उध्दारास्तव गा
जन्म घेतो लडिवाळा
अवघ्या जगताचा बा
तुरूंगवास ही संपला
संभवामि युगा युगात
शब्द राखला आपला
रात्रीच्या गर्भा मधूनि
येई लखलख ज्वाळा
संपवायला अंधकारा
अरूणोदयाचाउजाळा
स्नेह धारा बरसायला
येई दाटूनि घन निळा
श्रावणा दिवाळी सण
उधाण आले गोकुळां
धेनु स्तनाला महा पुर
दुग्ध वाहती घळाळा
पशू पक्षी सुखे नाचे
सूर आळवी कोकिळा
सवंगडी मिळो खेळा
उत्साह दाटे गोपाळा
गोपीकांनो आता जरा
घट आपले सांभाळा
रूप देखणे असे कुठे
श्रीरंग आगळा काळा
पहात राहू कितीबाळा
जीव माझा करे खुळा
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..