सातारा/अनिल वीर : जिल्ह्याचे थोर शिल्पकार क्रांतीवीर स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची ११९ वी जयंती ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करंजखोप, ता. कोरेगाव येथे सोमवार दि.२६ रोजी सकाळी १० वा. साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते उद्धव (दादा) कर्णे यांनी दिली.
यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच राधिका यशवंत धुमाळ, उपसरपंच सुरज शिंदे,विकास सोसायटीचे चेअरमन प्रा. शामराव शिंदे व चेअरमन किशोर भोसले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायटीचे संचालक उपस्थित राहणार आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात देशभक्त आबासाहेब वीर हे भूमिगत होते.त्या काळात त्यांनी करंजखोप येथे वास्तव्य केले होते. शूरवीर किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली जात आहे. यावर्षी आयोजित कार्यक्रमास आबासाहेब वीर यांचे अनुयायी, स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे. असेही आवाहन कर्णे यांनी ग्रामस्थ मंडळ आणि युवक मंडळाच्यावतीने केले आहे.