पदाचा गैरवापर केल्याच्या ठपका
पुणे : येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांना बडतर्फ केले आहे. महिला व बाल कल्याणच्या आयुक्तांनी गुरुवारी (10 ऑक्टोबर) याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 29 मे 2024 रोज्यी पुण्यात एका भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात दुचाकीवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील कारचालक आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता, असं समोर आलं होतं.
आरोपीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यानं पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केलं. मात्र, बाल न्याय मंडळाने त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीसह इतर वादग्रस्त अटींसह जामीन मंजूर केला होता. त्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.
महिला व बाल विकास आयुक्तालयाने त्याची गंभीर दखल घेऊन बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच चौकशी समितीही स्थापन केली होती.
समितीने सादर केलेल्या अहवालानुसार बाल न्याय मंडळाचे दोन सदस्य आपल्या (मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा, 2015) अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल दोषी आढळून आले आणि त्यामुळे राज्य सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केली आहे.
पुण्यात एका भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवरील दोघांना धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील कारचालक आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता, असं समोर आलं आहे. स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यानं पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केलं. त्यानंतर काही अटी घालत आरोपीला जामीनही मंजूर झाला. पण, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपीला एवढा लवकर जामीन कसा मिळाला? हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये विचारला जात आहे.