रावणगाव परशुराम निखळे
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रावणगाव (ता.दौंड) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थिती मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे
दौंड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील राजकीय वातावरण यामुळे चांगलेच तापल्याचे दिसून आले. रावणगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक आटोळे यांच्या सह चाळीस कार्यकर्त्यांनी आज जावजीबुवाची (ता.दौंड) येथील कार्यक्रमात आमदार कुल यांच्या उपस्थिती मध्ये भाजपात प्रवेश केला विधानसभा निवडणूक जवळ येत असताना आमदार राहुल कुल यांना महायुतीची उमेदवारी फिक्स मानली जात असताना माजी आमदार रमेश थोरात हे अपक्ष की तुतारी या चिन्हावरून निवडणूक लढणार या संदर्भात आडाखे बांधले जात असतानाच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे दौंड तालुकाध्यक्ष उत्तमराव आटोळे यांचे होम पिच असलेल्या रावणगावातूनच अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने त्यांनाच एका प्रकारे हे राजकीय आव्हान दिले असल्याचे दिसून येते पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये विकास सोसायटीचे माजी उपाध्यक्ष दत्तू आडसूळ, सागर आटोळे, संजय आटोळे, अमोल पानसरे, राम देशमाने, हार्दिक आटोळे, विशाल आटोळे, मोहन आटोळे, दादा सांगळे, अजित पोमणे, प्रमोद आटोळे,अमित आटोळे, दादा आटोळे,तानाजी साळुंखे, किशोर आटोळे, बारीक सांगळे, महेश देशमाने, हनुमंत शिंदे, मनोहर शेळके, आप्पा पाटोळे, विक्रम आटोळे, सुरेश अडसूळ, अशोक कोकाटे, कांतीलाल आटोळे, अमित आटोळे, शुक्राचार्य आटोळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह चाळीस जणांचा यामध्ये समावेश आहे
यावेळी भारतीय जनता पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, भीमा पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, संपतराव आटोळे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुगाची आटोळे, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम आटोळे, संजय गाढवे, निलेश पोमणे, विकास आटोळे, संग्राम भोपाळ,विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासो आटोळे,जितेंद्र नेमाडे, अतुल सांगळे, अजित सांगळे, अनिल पोमणे, गबाजी गाढवे उपस्थित होते