कोपरगाव प्रतिनिधी :
जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत व पंचायत समिती शिक्षण विभाग कोपरगाव आयोजित केंद्रस्तरिय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच चांदेकसारे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी ता कोपरगाव शाळेने घवघवीत यश मिळवले. प्रथम क्रमांकाची नऊ बक्षिसे, द्वितीय क्रमांकाची सहा बक्षिसे व तृतीय क्रमांकाचे एक बक्षीस. अशी तब्बल सोळा बक्षिसे प्राप्त करत शाळा केंद्रात अव्वल ठरली. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे
हस्ताक्षर स्पर्धा
कुमार गट
सिद्धी सुनिल जावळे इयत्ता 7 वी – प्रथम क्रमांक
किशोर गट
श्रध्दा विनायक गुडघे इयत्ता 5 वी – तृतीय क्रमांक
वक्तृत्व स्पर्धा
बालगट
श्रद्धा सुनील जावळे इयत्ता 4 थी – द्वितीय क्रमांक
कुमार गट
संस्कृती सर्जेराव घोडेराव इयत्ता 7 वी – प्रथम क्रमांक
गोष्ट/कथा सादरीकरण
किशोर गट
वैष्णवी लक्ष्मण जावळे इयत्ता 6 वी – द्वितीय क्रमांक
कुमार गट
अक्षदा विजय गुडघे इयत्ता 7 वी – प्रथम क्रमांक
वेशभूषा सादरीकरण
बालगट
अक्षरा विलास दहे इयत्ता 4 थी – द्वितीय क्रमांक
किशोर गट
ऋतुजा किशोर जावळे इयत्ता 6 वी – द्वितीय क्रमांक
कुमार गट
वेदिका राजेंद्र जावळे इयत्ता 7 वी – प्रथम क्रमांक
वैयक्तिक गीतगायन
किलबिल गट
तनुजा वाल्मिक सोदक इयत्ता 2 री – प्रथम क्रमांक
किशोर गट
आराध्या चंद्रकांत जावळे इयत्ता 5 वी – प्रथम क्रमांक
कुमार गट
समृद्धी सुरेश जावळे, इयत्ता 7 वी – प्रथम क्रमांक
समूहगीत गायन स्पर्धा
लहान गट – द्वितीय क्रमांक
मोठा गट – प्रथम क्रमांक
सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा
लहान गट – प्रथम क्रमांक
मोठा गट – द्वितीय क्रमांक
यासाठी शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र रहाणे,शिक्षक विलास गवळी , मनोहर वहाडणे , अनिल पराड , चंद्रविलास गव्हाणे , सुरेश धनगर , कविता पानसरे व प्रीती जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रहाणे , चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे , तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे, उपाध्यक्ष सोमनाथ रायभान, सर्व सदस्य, सरपंच शकुंतला गुडघे,उपसरपंच संजय गुडघे सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ सोनेवाडी यांनी विशेष कौतुक केले.