डॉ.राहुल गुडघे यांच्याकडून सोनेवाडीत शेकडो रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी 

0

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल शनिवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परिसरातील शेकडो रुग्णांची  डीएम कार्डिओलॉजी गोल्ड मेडलिस्ट डॉ. राहुल गुडघे यांनी हृदयरोग तपासणी करत योग्य मार्गदर्शन केले.

कै. दौलतराव गुडघे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सोनेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ही तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत सोनेवाडी, संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यामाने हे शिबिर यशस्वी करण्यात आले. 

डीएम कार्डिओलॉजी गोल्ड मेडलिस्ट झाल्यानंतर सोनेवाडी ग्रामस्थांनी डॉ राहुल गुडघे यांचा नागरी सत्कार केला होता. यावेळी डॉक्टर गुडघे यांनी सोनेवाडीतील हृदयरोग रुग्णांसाठी वर्षातून एक दोन वेळेस मार्गदर्शन शिबिर घेतले जाईल असे जाहीर केले होते. तो शब्द डॉक्टर गुडघे यांनी पाळत गावातील रुग्णांची तपासणी केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने डॉ‌ गुडघे व संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटरचे डॉ शुभम गायकवाड, डॉ मानसी पाटील, डॉ संग्राम पाबळे, डॉ गौरव थोरात, डॉ सानिका डाकोले, डॉ पूर्व उदार, डॉ जयश्री राजवाडे, डॉ आनंदा वाघ, डॉक्टर संदीप दिघे, आरोग्य सेविका मैंड, आशा सेविका आशाताई फटांगरे, श्रीमती गुडघे, श्रीमती चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोनेवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ जावळे होते. यावेळी शिवाजी जावळे, बाबासाहेब फटांगरे, निरंजन गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे,आनंदराव जावळे, हरिभाऊ जावळे , साहेबराव फटांगरे,धर्मा जावळे, राजेंद्र गुडघे, किशोर जावळे, हेमराज जावळे, आबासाहेब जावळे, चिलु जावळे, भाऊसाहेब खरे, शशिकांत लांडगे, मच्छिंद्र गुडघे अदी उपस्थित होते.

सुरुवातीला कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सीपीआर ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आला. व नंतर ग्रामपंचायत कार्यालयात हृदयरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, छाती दुखणे ,चालताना दम लागणे, वाँल्व संबंधित रोग, जन्मजात हृदयरोग, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा ,इसीजी, आँजीओप्लास्टी, इको कार्डिओग्राफी, अँजीओग्राफी, पेसमेकर व टी एम टी अदी आजाराच्या श तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार निरंजन गुडघे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here