सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने पानिपत शौर्य दिवस साजरा…

0

कोपरगाव : येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत युध्दाचा २६३ वा शौर्य दिवस सोमेश्वर महादेव देवस्थान, कोपरगाव गांवठाण वेस समोर साजरा करण्यात आला आहे. पानिपतच्या रणभूमीवरील रणझुंजार वीर योद्धा श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार, मराठा साम्राज्याची पताका अटकेपार नेणारे श्रीमंत रघुनाथराव (राघोबादादा) बाजीराव पेशवा, कोपरगाव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहीम सदाशिवराव (खासेसाहेब) श्रीमंत महामहीम यशवंतराव (भाऊसाहेब) सदाशिवराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, कोपरगांव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, शिवचरित्र व्याख्याते राजेंद्र खैरनार, ईतिहास तज्ञ प्रा. किरण पवार, सोमेश्वर महादेव देवस्थान व्यवस्थापन समितीचे नारायण अग्रवाल, मराठा पंचाचे मंदार आढाव, ज्येष्ठ नागरिक उध्दवराव विसपुते यांचे हस्ते करण्यात आले.”हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमंत महामहीम पवार सरकार की जय” असा जय घोष करीत २१ तोफांची सलामी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पानिपतच्या रणभूमीवर विशेष कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहिले. शूरवीरांच्या बलीदानपुढे तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने नतमस्तक होवून अभिवादन केल्याने समाधान वाटल्याचे शिवचरित्र व्याख्याते राजेंद्र खैरनार यांनी सांगितले. 

या प्रसंगी प्रमुख उपस्थित ईतिहास तज्ञ प्रा.किरण पवार यांनी पानिपतच्या रणभूमीवर शौर्य गाजवणारे श्रीमंत पवार घराणे यांनी कोपरगांवच्या जडणघडणीत दिलेले योगदान महत्वपुर्ण असल्याचे सांगतले. याप्रसंगी श्रीमंत पवार सरकार व श्रीमंत पेशवे यांच्या कोपरगावातील वास्तव्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.

प्रारंभी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, कोपरगांव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी सोमेश्वर महादेवास अभिषेक करुन पुजा व आरती करुन कोपरगावच्या स्वार्थासाठी प्रार्थना केली. यानंतर त्यांच्या मानाचे स्नेहवस्र,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प स्वागत करण्यात आले.याप्रसंगी सोमेश्वर महादेव भक्त परिवाराचे जयंत विसपुते, महावीर शिंगी, धनंजय कहार,पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, नंदू शेंडे-गुरव ,कोपरगाव शिवमंदिर संवर्धन अभियानाचे सागर केकाण, आदिंसह सोमेश्वर देवस्थान भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते. श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान प्रमुख महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here