राहुरी फँक्टरी येथील बस स्थानकाची चोरी

0

पोलिस, महामंडळ, बांधकाम खात्याला लागेना शोध

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :

                 नगर मनमाड महार्गावरील राहुरी फँक्टरी येथिल बस स्थानक गँस पाईप लाईनच्या खोदकामाचा बळी ठरले आहे.सदर चे बस स्थानक शोधुनही सापडत नसल्याने राहुरी फँक्टरी चे बस स्थानक चोरी गेले की काय ? अशी शंका प्रवाशांना निर्माण झाली आहे.महामंडळ व पोलिस सार्वजिनिक बांधकाम खाते आदींना बस स्थानकाचा शोध लागेना चोरी गेलेले बस स्थानकाचा पोलिस शोध घेणार का? बस स्थानक काढुन घेणाऱ्या गँस पाईप लाईन टाकणाऱ्या ठेकेदारा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करणार असा प्रश्न उन्हाची तीव्रता झेलणाऱ्या प्रवाशांनी केला आहे.

         

याबाबत सविस्तर वृत्त असे की नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फँक्टरी  प्रवाशांच्या सोयीसाठी पक्के बस स्थानक उभारलेले होते. एका अपघातात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात ट्रक घुसल्याने पक्या बस स्थानकाची मोडतोड झाली होती.महामंडळाने व बांधकाम विभागाने या बस स्थानकाकडे ढुंकुणही पाहिले नाही. अपघातग्रस्थ बस स्थानक  काढण्याचा निर्णय येथिल शिवतेज मित्र मंडळाने घेतला.शिवतेज मित्र मंडळाने लोखंडी बस स्थानक तयार करुन या ठिकाणी बसविण्यात आले होते.परंतू या बस स्थानकासही साडेसाती लागल्या प्रमाणे पुन्हा गँस पाईप लाईन खोदकाम करताना फटका बसला.खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराने हे बस स्थानक काढुन टाकुन त्या जागेवरुन गँस पाईप लाईन टाकली.गेल्या एक दोन वर्षा पासुन येथे बस स्थानक नसल्याने येथिल बस स्थानकाची चोरी झाली की काय? असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

               

चोरी गेलेल्या बस स्थानका बाबत राहुरी पोलिस ठाण्यात महामंडळाने व सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही फिर्याद दाखल केलेली नाही.राहुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल नसल्याने चोरीचा शोध घेण्याचा आमचा संबधच नाही असे राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस अमंलदार सांगतात.

              सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे.प्रवांशाना तासन तास बसची वाट पाहण्यासाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे.वृद्ध,विद्यार्थी प्रवासा साठी उन्हात थांबत असल्याने अनेक प्रवाशांना उन्हाचा चटका लागुन चक्कर येवून पडण्याचे सातत्याने घडत आहे.राहुरी फँक्टरी येथे बस स्थानक नसल्याने या मार्गावरील अनेक बस येथे थांबा घेत नाही.त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणाहुन प्रवास सुरु करण्यापुर्वी अनेक अडचणी येत आहे. राहुरी फँक्टरी  येथिल चोरी गेलेल्या बस स्थानकाचा शोध लावावा.बस स्थानक काढणाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here