बैठे पथक बाहेर घेतय पाहुणचार , आत चालते कॉपी

0

निकालाची परंपरा राखण्यासाठी संस्था चालकांचा पाहुणचाराचा फंडा

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

           दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात,यासाठी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाने यंदा कडक उपाययोजना केल्याने अनेक केंद्रावर कॉपीला आळा बसला आहे.परंतु, प्रशासनाची पकड ढिली झाल्याने भरारी पथक व  बैठे पथक बाहेर पाहुणचारात मग्न होत असल्याने शिक्षण संस्थेच्या निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी संस्था चालक प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या मार्फत पाहुणचारावर खर्च करा विद्यार्थी काँपी लिहताना  रंगेहाथ पकडला जाणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठी भरारी पथक व बैठे पथक यांच्या पाहुणचारासाठी चांगलाच खर्च केला जात आहे.पाहुणाचार घेई पर्यंत परीक्षा हाँल मध्ये कोणाकडे काँपी असेल तर ती फेकुन किंवा लपविण्यास सांगितली जाते. त्यामुळे वर्गात कॉपीचा प्रयत्न होत असतानाही डोळे झाक केली जात आहे.शिक्षण संस्था चालकांनी माञ पाहुणचारांचा फंडा काढुन निकालाची परंपरा टिकविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. 

             

मंगळवारपासून (दि. ११) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. बारावीच्या परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येत आहे. ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेबकास्टिंगचे सनियंत्रण दक्षता समितीमार्फत करण्यात येत आहे. परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरून विशेष भरारी पथक, संवेदनशील केंद्रांवर अधिक बंदोबस्त देण्यात आला आहे. राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, जिल्हाभरात ही पथके कार्यरत झाली झाली आहेत.

                 परीक्षा मंडळाने विशेष खबरदारी घेवून स्वतंञ पथके तयार केली आहेत. परंतू शिक्षणाच्या बाजारीकरणात संस्थेच्या निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी संस्था चालक प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्फत भरारी पथक व बैठे पथकाला चांगल्या प्रकारे पाहुणचार करण्याचा सल्ला दिला आहे.त्यासाठी किती ही खर्च झाला तरी चालेल पण काँपी लिहताना सापडलेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार याची काळजी घेण्याचे आदेश संस्था चालकांनी दिले आहे.बैठे पथकही संस्था चालकाच्या पाहुणचारा मस्त अस्वाद घेत असल्याची चर्चा सध्या शिक्षण क्षेञात सुरु आहे.परीक्षा संपल्या शाळेच्या रस्त्यावर परीक्षा हाँल मध्ये लिहलेल्या काँप्या मोठ्या रस्त्यावर फेकताना दिसताता. एकीकडे काँपीला बंदी असताना विद्यार्थी खिशातुन काँप्या काढुन रस्त्यावर कशा टाकतात.यावरुन बाहेर जरी काँपी होत नसल्याचे सांगितले जात असले तरी माञ विद्यार्थी माञ परीक्षा हाँलमध्ये काँपी करतात हे रस्त्यावर पडलेल्या काँपीवरुन लक्षात येते.

                 जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांनी परीक्षा सुरू होताच विविध पातळ्यांवर काम करायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रांमध्ये सुमारे १,००० परीक्षा खोल्या वेबकास्टिंगच्या माध्यमातून जोडण्यात आल्या आहेत.परीक्षा केंद्रांवरील हालचालींचे नियंत्रण खास पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉररूममधून केले जात आहे.पहिल्या दोन – तीन पेपरला कोठेही कॉपीचा प्रकार झाला नाही. मात्र, प्रशाकीय यंत्रणेची पकड काहीशी ढिली होताच,भरारी पथक व बैठे पथकांसाठी संस्था चालकांच्या माध्यमातून पाहुणचाराचा फंडा सुरु झाल्याने काही केंद्रांवर कॉपीचे तुरळक प्रकार होत असल्याचे समोर येत आहे.

                 प्रत्येक केंद्रावर बैठे पथक आहे. मात्र, हे पथक खालीच बसत असल्याने काही ठिकाणी वर्गात कॉपी होते.या पथकाच्या कानिलाही खबर लागू दिली जात नाही. बैठे पथक एका जागेवर बसुन संस्था चालकाच्या माध्यमातून पाहुणचारावर ताव मारण्यात दंग होत असल्यामुळे काँपी मुक्त परीक्षा होवू शकतच नाही.अशा केंद्रावर बाहेरच्या केंद्र संचालकांनी या बैठ्या पथकाची मदत घेऊन आपले केंद्र कॉपीमुक्त करावे.आशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वेब कास्टिंगचे फुटेज केव्हाही तपासणार :केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे असून सर्व केंद्र वेबकास्टिंगने जोडलेली आहेत. त्यांचे मॉनिटरिंग जिल्हा स्तरावरून खास पथकामार्फत केले जात आहे. हे फुटेज कधीही तपासता येणार असल्याने विद्यार्थ्यांनाही जपून राहावे लागेल.

■  प्रत्येक परीक्षा केंद्रावर जे बैठे पथक आहे, त्यांनी बाहेर गस्त घालण्याबरोबरच केंद्र संचालकांच्या मागणीनुसार वर्गातही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कॉपीला आणखी आळा बसेल. तशा सूचना दिलेल्या आहेत.जर बैठे पथक जर सुचना पाळत नसतील पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करावी. अशोक कडूस, शिक्षणाधिकारी

भरारी व बैठे पथकाच्या पाहुणचारावर बंदी घातली पाहिजे

              दहावी व बारावी परीक्षेसाठी नेमलेल्या भरारी पथकांनी आपले कर्तव्य बजावत असताना नाती गोती  बाजुला ठेवून ज्या परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी जातील तेथे फक्त कर्तव्य बजावले पाहिजे. संस्था चालकांच्या माध्यमातुन प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या मार्फत पुरविला जाणारा पाहुणचार घेण्याचे टाळले पाहिजे.भरारी व बैठे पथकाने पाहुणचार टाळला तरच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले जावू शकते.त्यामुळे शिक्षण विभागाने भरारी वा बैठे पथकांना पाहुणचार घेण्यास बंदी घातली पाहिजे. : एक पालक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here