आचार्य बाळशास्त्री
पत्रकारीतेचे स्पंदन
उगाळू तेवढे सुगंधी
ज्ञानाचे अद्भुत चंदन…
दर्पण वर्तमान पत्रात
करी समाज प्रबोधन
शिलालेख ताम्रपटात
अपूर्व असे संशोधन…
समस्यावर हवी चर्चा
नेटिव्ह संस्था स्थापन
पत्र चालवी स्वखर्चा
दर्पणी शून्य विज्ञापन…
ज्ञान दहा भाषेचे तव
पांडित्य विचारे सधन
ज्ञान कावड न्या पुढे
हेच आवडते मानधन…
व्याधिग्रस्त समाजात
रूढीरिवाज आक्रंदन
तेंव्हा केली हेटाळणी
आज करतोयं रूदन…
अत्यल्प आयुष्य तव
काळाने घातले बंधन
कार्य आभाळा एवढे
इतिहास करी वंदन…
– हेमंत मुसरीफ पुणे
२)आसाराम ..
आसाराम बापू म्हणे
श्रीसंत स्वयं घोषित
मानतात स्वता कसे
असे ईश्वराचे प्रेषीत…
कोवळ्या कळ्या घेई
बळजबरीने कुशीत
तयार होतात कुवृत्ती
कोणत्या क्रूर मुशीत…
माणूस म्हणावे कसे
रक्तचं ज्यांचे दूषीत
षड्रिपुंची साथसंगत
वासना राहे आश्रीत…
कोण मले रोकू शके
हो मदान्धाने बाधीत
दांभीकपणाचे किडे
वळवळे सत्ता गादीत…
भोवताली अंध भक्त
चमत्कारे सम्मोहित
उघडले डोळे त्यांचे
कुप्रकार होई माहीत…
असूरी वृत्तीचा अंत
असे ठरला निश्चित
जन्मठेप भोग शिक्षा
रहा कोडठी निश्चींत…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६..