सातारा : पँथर नामदेव ढसाळ यांच्याबाबत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयाबाबत न्याय मिळाला नाही.तर दि.११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पुजाताई बनसोडे यांनी दिला आहे. दलित पँथरचे व युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगण्याकरता, चल हल्लाबोल ! या चित्रपटांमध्ये नामदेव ढसाळ यांची एक कविता घेतली गेली होती. ज्यामध्ये अगनीत सूर्यांनो ही कविता ऐकताच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी कोण आहे हा नामदेव ढसाळ ? आणि ही असली कसली कविता आहे ? ही कविता चित्रपटातून काढून टाका. अन्यथा, चित्रपटास परवानगी देणार नाही. हे अपमानकारक,आंबेडकरी चळवळीचे मन दुखेल आणि आंबेडकरी समस्त आंबेडकरी चळवळीचा अपमान होईल. अशा पद्धतीचे वक्तव्य करून पॅथर नामदेव ढसाळ यांचा अपमान केला आहे. तरी या संदर्भात सेन्सॉर बोर्डाने मीडियाद्वारे माफी मागावी. अन्यथा,बोर्डाच्या सदस्यांनी व अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
बोर्डाचे हे वागणे म्हणजे सांस्कृतिक चळवळ संपवण्याचे काम सुरू आहे. संस्कृती जपणाऱ्या सांस्कृतिकचे दर्शन दाखवणे. हे सेन्सॉर बोर्डाचे काम आहे. पण एकच संस्कृती दाखवण्याचे काम कटकारस्थान हे मनुवादी लोक करत आहेत. आमचे नामदेव ढसाळ हे चळवळीतील फार मोठे कार्यकर्ते नेते तसेच दलित साहित्यिक आणि कवी होते. त्यांची शब्दाची संपत्ती ही तोंडाने न व्यक्त करता येण्यासारखी आहे.महाराष्ट्र सरकारकडून पद्मश्री तसेच इतर अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव केलेला आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी चल हल्लाबोल हा चित्रपट येणार होता. पण जातीवादी असलेल्या सेन्सर बोर्डाने नकार दिला आहे.
पुन्हा एकदा जातीवाद हा कायम केला. तेव्हा आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महिला आघाडीच्यावतीने अशी मागणी आहे की, लवकरात लवकर सेन्सॉर बोर्डवरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.अन्यथा दि.११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र प्रकाराचे अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल.जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.असेही अध्यक्षा पुजाताई बनसोडे यांनी म्हटले आहे. सदरच्या निवेदनावर पुजाताई बनसोडे यांच्यासह एम.बी.गायकवाड,विमल काकडे,मीना काकडे,लक्ष्मीताई सौ.वाघमारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.