क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचा त्याग राष्ट्र उभारणीसाठी महत्वपुर्ण : डॉ.भगवान बाबा आनंदगडकर

0

बुलडाणा /पुणे प्रतिनिधी ; गुंधा ता.लोणार जि.बुलढाणा येथे क्रांतीगुरु बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंधा यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलनाच्या कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला. ह भ प डॉ.भगवान बाबा आनंदगडकर ह्यांच्या उपस्थित संपन्न झाला.या डॉ.भगवान बाबा आनंदगडकर म्हणाले की,”हा कार्यक्रम एक आगळावेगळा आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व गाव एकत्र येऊन लहुजी साळवे यांची जयंती साजरी करत आहे .

हा सोहाळा बघून खरंच या गावात समरसता आधीपासूनच नांदत आहे/ असं वातावरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जर झालं तर जाती व्यवस्था नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.त्यांमुळे हे गुंधा गाव हे सामाजिक दृष्टया आदर्श आहे.क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचा त्याग राष्ट्र उभारणीसाठी महत्वपुर्ण आहे”  या प्रसंगी डॉ.अंबादास सगट,मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे,प्रा विठ्ठल गीलवरकर, विजय मोरे,बबनराव ओव्हर ,रमेश ओव्हर पो पाटील ,गजानन माने,
सचिन साबळे,संदिप मानकर ,पुरुषोत्तम केंद्रे,पुरुषोत्तम येऊल ,सुरेश कायंदे,अभिमन्यु वाढवे ,सुधाकर माने इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. तर ह भ प डॉ नन्हई महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

लोणार पंचायत समितीचे माजी सभापती केशवराव फुके,भूषण मापारी , ज्ञानदेव मानवतकर तसेच कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शंकराव मानवतकर आणि गुंदा गावचे सर्व नागरिकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या वेळी महाराष्ट्रा तील अनेक गुणवंतांना पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच राज्यातील कविंनी उत्तमोत्तम कविता सादर केल्या.यावेळी डॉ.अंबादास सगट ,डॉ धनंजय भिसे यांनी मनोगत व्यक्त केली . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here