कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील उक्कडगाव येथील समाधी साधना केंद्र वट विरीयांंग वंसाराम विहाराला थायलंड येथील वट्पा सोमदेत फ्रा ज्ञानवजिरोदोम लुअंग फो विरीयांग सिरिन्धरो विहारातील पु. भिक्खु ख्रुबा पाइरोज ओपासो आणि भिक्खु संघाने सदिच्छा भेट दिली.
यावेळी भन्ते आनंद सुमान्सिरी तसेच उपासकांनी भिक्खू संघाचे मोठ्या उत्सहात स्वागत केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना पु. भिक्खु ख्रुबा पाइरोज ओपासो म्हणाले की उक्कडगाव सारख्या छोट्या गावामध्ये एव्हढे भव्य विहार उभे राहणे म्हणजे येथील भन्ते आणि उपासकांचे श्रेय आहे. येथील उपासकांनी केलेल्या स्वागताने आपण भारावून गेलो आहे.
क्कडगाव येथील वट विरीयांंग वंसाराम विहार हे समाधी साधनेसाठी समर्पित आहे. पुज्य लुअंगफो विरियांग सिरीन्धरो यांनी सांगितलेल्या समाधी साधना लोकांना शिकवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहु. मला खुप आनंद आहे की पुज्य ख्रुबा पाइरोज ओपासो थायलंड यांनी त्यांची शाखा असलेल्या वट विरीयांंग वंसाराम विहार उक्कडगावला भेट दिली.