येवला शहरातील सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर खाजगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

0

येवला प्रतिनिधी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच श्री लक्ष्मी मोटार ड्रायव्हिंग स्कूल येवला, येवला शहर पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येवला शहरातील सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर खाजगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम फक्त नियम म्हणून न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून वाहतुकीचे नियम पाळा आणि एक सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडा असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आज येवला दौरावर असताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी या उपक्रमानिमित्त येवला शहरातील सिग्नलची पाहणी केली. यावेळी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याबाबत पोलीस व नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, लक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमुख मोहन शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, राजेश भांडगे, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब धनवटे, भूषण लाघवे, महेश गादेकर, विशाल परदेशी, गोटू मांजरे, प्रीतम शहारे, प्रकाश बागल, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here