उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील गावठाण-चिर्ले येथील जासई विभागीय काँग्रेस अध्यक्ष विनोद पाटील यांचे वडील राम बाळू पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी श्रद्धांजली वाहून शुक्रवारी सांत्वन केले.गावठाण-चिर्ले येथील जुनेजाणते कार्यकर्ते राम बाळू पाटील यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त कुटुंबीयांनी भजन-किर्तन आयोजित करून दिवंगत राम पाटील यांना अनोखे श्रद्धांजली पुष्प गुंफले आहे.