दोघांना सिव्हिलमध्ये ऍडमिट !! ते आरोपी गजाआड !!!
अनिल वीर सातारा : ऊसतोड कामगारावर अन्याय झाला असून न्यायासाठी अनेक आंदोलने केली होती. त्या आरोपींना अटक केली आहे. मात्र,पूर्णतः भरपाई मिळत नाही. तो पर्यंतचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण चालुच राहणार असल्याचा निर्धार असून दोघांची तब्बेत खालावल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली गेले पाच दिवस झाले आमरण उपोषण सुरू आहे.मदन खंकाळ म्हणाले,”त्या दोन आरोपींनी ऊसतोड कामगारांच्या बैलजोड्या ताब्यात घेतल्या आहेत.त्या सर्व ताब्यात द्याव्यात.शिवाय,आतापर्यंत जे आर्थिक नुकसान झाले आहे.त्याची पूर्णतः पुर्ती करावी.तेव्हाच आमरण उपोषण थांबविण्यात येईल.”
यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे, सातारा तालुक्यातील लिंब येथे मागासवर्गीय ऊसतोड कामगारांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या गाड्या तसेच १४ बैल जोड्या जबरदस्तीने गावगुंडांच्या सहकार्याने ओढून नेणाऱ्या रजपूत व सूर्यवंशी यांच्या टोळीवर सुद्धा ॲट्रॉसिटी तसेच मोकांतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे.याबाबत सम्बधितांना सविस्तरपणे निवेदने दिली आहेत.तेव्हा सखोल चौकशी करून कारवाई करावी.यावेळी ऊसतोड कामगार आपापल्या कुटुंबासोबत उपोषणात सहभागी झाले आहेत.
दादासाहेब ओव्हाळ यांच्यासह मदन खंकाळ (बापू),नितीन बोतांलजी,मनीषा सोनावणे, सागर मोरे,सुनील ओव्हाळ,मुकुंद माने,विजय ओव्हाळ,किरण ओव्हाळ,सागर जाधव,सर्जेराव मोरे,पांडुरंग सोनवणे,संजय मोरे,सुनंदा मोरे,अंजली जाधव,लता मोरे,ईश्वर पाटील,कमल सोनावणे,सुनीता मोरे,दीपक भोसले,विनोद ओव्हाळ,राकेश जाधव,राज चव्हाण,राजू शिंदे,सिद्धार्थ समिन्दर,बंटी गायकवाड, राजेश ओव्हाळ, किशोर उगळे,कुमार ओव्हाळ, सनी गाल्फाडे, पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी उपस्थीत होते.त्यामध्ये ऍड. विलास वहागावकर, अनिल वीर आदी मान्यवर उपस्थीत होते.