पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो – बिपीनदादा कोल्हे

0

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्वीचा इतिहास पाहता भुसारासाठी सर्वोत्तम बाजारपेठ होती. काळानुरूप खाजगी बाजार समित्या आणि पाण्याच्या तुटवडा यामुळे बाजार समितीला स्पर्धात्मक वातावरण झाले आहे. मंचावर सर्वच पक्षाचे नेते आता एकत्र आहे त्यामुळे जसे इतर प्रश्न सुटतात तसे या पंचवार्षिकमध्ये केवळ फक्त पाणी हा एकमेव प्रश्न घेऊन आपण विधानसभा आणि मंत्रालय पातळीवर मैदानात उतरल्यास पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून मोठा प्रश्न सुटू शकतो. असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) कोपरगांव येथील जागेचा भूमिपुजन सोहळा रविवार मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. बाजार समितीला सर्वोतोपरी सहकार्य आपले आहे आणि पुढेही कायम असेल. कारण सहकारी तत्वावर चालणारी ही संस्था भरभराटीला आली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल असे यावेळी ते म्हणाले.

शेतकरी हा आयुष्यभर काबाड कष्ट करतो. इतर नोकरदार वर्गात निवृत्ती असते मात्र शेतकरी कधी निवृत्ती घेत नाही. दुर्दैवाने अती कष्टाने शरीर थकले जाते.शासनाने शेतकरी पेन्शन योजना सुरू करून वेगळा आधार देण्याची गरज आहे तरच भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील.राजकीय नेत्यांनी एकोपा दाखवत स्व.कोल्हे साहेब आणि स्व.काळे साहेब यांच्या प्रमाने एकत्र येऊन मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी लढणे गरजेचे आहे.आमचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सुरू आहेतच मात्र विधानसभेत आमदार आशुतोष काळे यांनी तर राजेश परजने यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरून कोपरगांवचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करावे व जिथे आवश्यकता आहे तिथे आम्हीही येण्यास तयार आहोत,न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे मात्र कोपरवागाच्या दृष्टीने राजकीय दुर्मिळ योग आहे यात आता हा पाणी प्रश्न सुटला पाहिजे असा आग्रह बिपीनदादा कोल्हे यांनी धरला.

या प्रसंगी आ.आशुतोष काळे,गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश (आबा) परजणे,पोहेगाव नागरी  पतसंस्था चेअरमन नितीनराव औताडे,जेष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे,बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे,कोल्हे कारखाना व्हा.चे.राजेंद्र कोळपे, शंकरराव चव्हाण,जागा मालक बाळासाहेब वाघ, बाजार समिती सचिव नानासाहेब रणशूर,कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व आजी माजी संचालक,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे सह. साखर कारखाना,कृषी उत्पन्न बाजार समिती विविध संस्था आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच, पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, सर्व व्यापारी,पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here