देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व काजगाव या दोन गावांमध्ये बिबट्याने धुमाकुळ घातला असून देवळाली प्रवरात एक तर करजगाव येथे दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे.
देवळाली प्रवरा येथे एक एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एकच्या सुमारास संतोष रामदास आटक यांच्या राहत्या घरी शेडमध्ये शेळ्यांच्या गोठ्यात एका शेळीवर बिबट्याने हल्ला चढविला इतर शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने घराबाहेर येवून पाहिले असता गोठ्या मध्ये शेळी दिसली नाही. आजूबाजूला बॅटरी च्या साह्याने शोध घेतला असता शेळी कुठे हि दिसून आली नाही.
सकाळी गोठ्यापासून किमान एक हजार फूटावर मक्याच्या शेतात शेळीचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसले.तर राहुरी तालुक्यातील करजगाव येथिल अविनाश अशोक आरंगळे यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्या फडशा पडला.राहुरीचे वन परीक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे मार्गदर्शनाखाली वनपाल आर एस रायकर, वनरक्षक एस एस जाधव, बाबासाहेब सिनारे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी विजू घोडके अंबादास अटक,सोमनाथ अटक, मनोज अटक,रामदास अटक,नेवरती अटक आदींसह उपस्थित होते.