गोंदवले प्रतिनिधी :- दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी प्राथमिक केंद्र शाळा वडजल शाळेस बरोबर १०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते…
शाळा स्थापना 1925 साली सुरु होताना विध्यार्थी जनरल रजिस्टर मधील नोंद असलेले माजी विध्यार्थी यांना शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये शिवाजी नामदेव काटकर. बापू दादा काटकर. रामहरी कोंडीबा काटकर. श्रीमंत बाबा काटकर. या सर्वांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना ही या कार्यक्रम साठी बोलावण्यात आले होते त्यांच्या ही सन्मान शाळेच्या वतीने घेण्यात आला…
सदर कार्यक्रमासाठी वडजल केंद्राचे केंद्रप्रमुख दिपककुमार पतंगे . वडजल गावाचे सरपंच धनंजय जाधव. उपसरपंच सौ. पारुबाई काटकर. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन काटकर.. सर्व सदस्य. पालक बंधू भगिनी उपस्थित होत्या..
शताब्दी महोत्सव निमित्त शाळेमध्ये गुणवंत विध्यार्थी सत्कार.. इ ४ थी विध्यार्थी निरोप समारंभ. व स्नेह भोजन असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राजीव हत्तीकर यांनी केले. तर आभार उपशिक्षिका सौ. रोहिणी खाडे मॅडम यांनी केले. शाळेच्या या शतक महोत्सवी गावातील सर्वच शिक्षण प्रेमी. पालक.. ग्रामस्थ यांनी केक कापून शाळेचा 100 वा वाढदिवस अगदी दिमाख्यात साजरा केला……