कोळपेवाडीचा “विवेक थोरात” ठरला महेश्वर केसरीचा मानकरी …

0

सुरेगाव प्रतिनिधी : महेश्वर यात्रा उत्सवामध्ये महेश्वर फेस्टिवल व मानाची कुस्ती अशा सामन्याच्या माध्यमातून महेश्वर फेस्टिवल सांगता समारोप कुस्त्यांच्या हगामाने झाला असून यामध्ये विविध जिल्ह्यांतील आलेल्या मल्लांमध्ये  पहिलवान विवेक थोरात हे महेश्वर केसरीचा मानकरी ठरला असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी व उल्लेखनीय समजली जाणारी महेश्वर यात्रोत्सवामध्ये कुस्ती हगामा दि.२  एप्रिल रोजी संपन्न झाल्या.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी व उल्लेखनीय असलेले व नवसाला पावन होणारे श्री क्षेत्र महेश्वर यात्रा उत्सव समिती व महेश्वर फेस्टिवल यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या महेश्वर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खास भव्य असे मैदान तयार करण्यात आले असून, महेश्वर केसरी विवेक थोरात (कोळपेवाडी) तर सचिन एलगर (मनमाड) यांच्यात फायनल झाली असून विवेक थोरात यांनी महेश्वर केसरी मानकरी झाले तसेच मेजर दत्तात्रय ठोंबरे (कोळपेवाडी) तर ओम पुंड (येवला) यांच्यात कुस्ती सामना रंगला असून यामध्ये मेजर ठोंबरे मानाच्या कुस्ती चे मानकरी झाले.

यामध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या पैलवानामध्ये अमर शिंदे, मयूर जानोसे, अतुल मायकल, दत्तात्रय कोळपे, अरुण गायकवाड ,दशरथ पैलवान, कुणाल बर्डी ,कौस्तुभ, अथर्व तांबट ,विवेक मायकल ,अक्षय डांगे अशा मल्लांनी बाजी मारली असून आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे यावेळी प्रेक्षकांसाठी व पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती कोळपेवाडी कुस्तीमय वातावरणामध्ये नाहून निघाली आहे. नामांकित पैलवान या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे अतिशय चांगल्या व प्रेक्षणीय कुस्त्या कोळपेवाडीकरांना पाहावयास मिळाल्या आहेत. यामध्ये मोठ्या कष्टाने शरीर कमावलेले हे पैलवान आणि त्यांची कुस्तीतील कसब पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून कुस्ती शौकीन आले होते. आपापल्या पैलवानांना प्रोत्साहनही देत आहेत.यावेळी पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती महेश्वर केसरी विवेक थोरात यांचे  विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here