येवला प्रतिनिधी : शिवसेनेचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना येवला शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले, महाराष्ट्रात कॉमन मॅन म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा लोकनेत्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने आमच्यासारख्या तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखविल्या गेल्या आहे.
भविष्यात अशी फालतुगिरी आम्ही खपवून घेणार नाही व झाल्यास याचे तीव्र पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही तरी याबाबत दखल घेऊन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना तर्फे येवला शहर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख अतुल घटे,विधानसभा प्रमुख किशोर सोनवणे, युवासेना शहरप्रमुख प्रतीक पुणेकर, उपतालुकाप्रमुख गणेश सोनवणे, उपशहरप्रमुख अमोल पारखे, उपशहरप्रमुख सोमनाथ शिंदे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.