‘महिलेच्या आडून मला संपवण्याचा कट.’; जयकुमार गोरेंच्या दाव्याने खळबळ

0

सातारा : काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्यांवर एका महिलेने गंभीर आरोप केले होते.त्यांनी ते आरोप फेटाळूनही लावले. पण त्यानंतर जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या एका महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना अटक करण्यात आली. संबंधित महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी जयकुमार गोरे यांच्याकडे तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर पोलिसांनी सापळा रचून 1 कोटी रुपयांची पहिली रक्कम स्वीकारताना तिला रंगेहात पकडले. या प्रकरणात आता जयकुमार गोरेंनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, ज्या महिलेच्या आडून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बीडप्रमाणे माझ्या विरोधात कट रचला गेला. पण मी पुरावे गोळा केले आणि वाचलो. त्यांचे कट करतानाचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. बीडमध्ये ज्याप्रकारे घटना घडली त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्लॅन होता. काहीजणांना कायमचे संपवून त्याचे षडयंत्र मी रचण्यापर्यंतचा त्यांचा प्लॅन होता. आताही माझ्याकडे यासंदर्भातले अनेक पुरावे आहेत. या प्रकऱणाचा तपास सुरू आहे. तपास होऊद्या मी त्यानंतर यावर बोलेन.
      भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवून विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला, 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. संबंधित आरोपी महिला गोरे यांच्याकडे तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी करत होती,या प्रकरणी गेल्या महिन्यात महिलेला रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयकुमार गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटातील काही नेत्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता. ही संपूर्ण कारस्थानपूर्वक रचलेली योजना होती.
दरम्यान, या प्रकरणी प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र, ते घरी नसल्याने पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी साताऱ्यात नेण्यात आले आहे. संबंधित महिला प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. मात्र पोलीस या प्रकऱणाचा तपास करत असल्याने मी काहीही बोलणार नाही, असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात प्रभाकर देशमुख यांचं नाव पुढे आल्याने सातारा पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तब्बल तीन तास चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देशमुख हे संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्रभाकर देशमुख यांची चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरातून बाहेर पडले असून, आता या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले, “त्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सध्या पोलीस तपास सुरू आहे. त्या तपासाबाबत माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी आत्ता काही बोलणार नाही. पोलीस त्यांचा तपास करू द्या. या प्रकरणात जे काही । स्पष्ट केलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here