राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

आजचा दिवस 

शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल अष्टमी, दुर्गाष्टमी, शनिवार, दि. ५ एप्रिल २०२५, चंद्र – मिथुन राशीत, नक्षत्र – पुनर्वसू, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३१ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५२ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत राहणार आहे. आजचा दिवस सकाळी ८ नंतर चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र केंद्रयोग, चंद्र – मंगळ युतीयोग, चंद्र – बुध व चंद्र – शुक्र त्रिकोणयोग व मंगळ – शनि त्रिकोणयोग होतआहे.  आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर कर्क, वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाईल.  

                                                  दैनंदिन राशिभविष्य

मेष : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नातेवाईकांना भेटायला जाणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत.काहीजण धार्मिक स्थळांना भेट देतील. 

वृषभ : जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. काहींना गुप्तवार्ता समजतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. 

मिथुन : उत्साहाने कार्यरत रहाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. हितशत्रूंवर मात कराल. प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : जिद्दीने कार्यरत रहावे लागतील. दैनंदिन कामात तुमच्या हातून एखादी चूक होईल. काहींना मनस्ताप होईल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. मनोबल कमी राहील.  

सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ होईल. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. प्रियजनांच्या सहवासात आजचा आपला दिवस आनंदात जाणार आहे.  

कन्या : आजचा दिवस आपल्याला अनेकदृष्टीने अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. नोकरी व व्यवसायातील तुमची कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. 

तुळ: तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. मनोबल उत्तम राहील. हितशत्रुंवर मात कराल. काहींना आज भाग्यकारक अनुभव येईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. गुरुजनांचे उचित मार्गदर्शन लाभेल. 

वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. तुमच्यावर कामाचा अनावश्यक ताण राहील. एखाद्या बाबतीत तुमची आज चिडचिड होणार आहे. 

धनु : जिद्द वाढेल. आरोग्य सुधारेल. तुम्ही आज आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. हितशत्रूंवर मात कराल. वैवाहिक जीवनात आंनददायी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. 

मकर : आजचा दिवस आपल्याला खर्चिक वाटेल. दैनंदिन कामास विलंब लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनावश्यक वादविवाद होतील. मनोबल कमी राहील. 

कुंभ : संततीसौख्य लाभेल. काहींना आज मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. व्यवसायातील तुमची कामे व तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत. आज आपल्याला विविध लाभ होतील. 

मीन : जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणाऱ्या घटना घडतील. प्रवास सुखकर होणार आहेत. आनंदी व आशावादी राहणार आहात. नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  

आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

न्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here