राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

आजचा दिवस 

शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल दशमी, सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – आश्लेषा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. २९ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५३ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र कर्क राशीत राहणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज रवि – चन्द्र त्रिकोणयोग व चंद्र – गुरु लाभायोग व शुक्र – शनि युतियोग होत आहे.  आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, मकर व मीन या राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.  

                                                  दैनंदिन राशिभविष्य 

मेष : आज आपले मनोबल अपूर्व असणार आहे. व्यवसायत सुयश लाभेल. नोकरीत स्वास्थ्य लाभणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपल्याला मानसन्मान लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : नातेवाईकांच्या सहकार्याने आज आपण एखादी समस्या सोडवू शकाल. काहींना गुरुकृपा लाभेल. व्यवसायानिमित्त अनपेक्षित प्रवास करावा लागणार आहे. चिकाटी वाढणार आहे.  

मिथुन : मनोबल उत्तम राहील. आजचे आपले आर्थिक नियोजन अचूक ठरणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवासात आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. 

कर्क : आज आपला उत्साह विशेष असणार आहे. गरजूंना मदत कराल. आपल्या नोकरीत आपला प्रभाव वाढणार आहे. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. आत्मविश्वास वाढणार आहे. 

सिंह : मनोबल कमी असल्याने अस्वस्थता राहील. आज आपल्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. आपण काळजी व दक्षता घ्यावी. आपले महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. 

कन्या : काहींना विविध लाभ होतील. जुन्या आठवणींत रमणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आज तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत.

तुला  : दैनंदिन जीवनात आनंददायी घटना घडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आपल्या महत्त्वाच्या कामात आज आपल्याला सुयश लाभणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.

वृश्चिक : तुम्हाला उचित मार्गदर्शन लाभेल. कामाचा ताण कमी होईल. नवा मार्ग दिसेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. महत्त्वाच्या कामात नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. प्रवास होतील. 

धनु : मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करु नये. काहींना आरोग्याच्या तक्रारी सतावणार आहेत.

मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. प्रवासात लाभ होणार आहेत. आज तुम्ही आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे.  

कुंभ : प्रवास शक्यतो आज नकोत. अचानक उदभवणारे खर्च मानसिक अस्वस्थता देतील. काहींना नैराश्य जाणवणार आहे. आज आपण कोणावरही अवलंबून राहू नये. वाहने जपून चालवावित.

मीन : दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रवासाचे योग येतील. आज तुम्ही प्रियजनांकरिता वेळ देऊ शकणार आहात. प्रवासात फायदा होईल

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here