राशिभविष्य/दिनविशेष/पंचाग

0

आजचा दिवस 

शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र कृष्ण प्रतिपदा, रविवार, दि. १३ एप्रिल २०२५, चंद्र – कन्या राशीत स. ७ वा. ३९ मि. पर्यंत नंतर तुला राशीत, नक्षत्र – चित्रा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. २४ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५४ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र कन्या राशीत स. ७ वा. ३९ मि. पर्यंत रहात असून नंतर तो तुला राशीत  रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – मंगळ केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.  

                                                दैनंदिन राशिभविष्य 

मेष : तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही हिमतीने आपली मते इतरांना ठामपणे पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : कामाचा ताण जाणवणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. काहींचा वेळ व्यर्थ वाया जाणार आहे.

मिथुन : आनंदी रहाणार आहात. आज तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. काहीजण जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. 

कर्क : सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करु शकणार आहात. 

सिंह : मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी प्रगती साध्य करु शकणार आहात. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. प्रवासात सौख्य लाभणार आहे.

कन्या : कौटुंबिक जीवनात आनंददायी अनुभव येणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आर्थिक कामात सुयश लाभल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे.

तुळ : आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आनंददायी घटना घडेल. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल उत्तम राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे. आज तुम्हाला एखादी चिंता सतावणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. अनावश्यक खर्च टाळावेत. कामे नकोशी वाटतील.

धनु  : आज तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असणार आहेत. तुमचा इतरांवर असणारा प्रभाव वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूलता लाभणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. 

मकर : तुमचा विशेष प्रभाव राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.

कुंभ  : तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. मनोबल वाढणार आहे. आज काहींना गुरुकृपा लाभेल. एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. प्रवासात सुखद अनुभव येईल. जिद्द वाढेल.

मीन : मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. अस्वस्थता जाणवणार आहे. आज आपण कोणत्याही बाबतीत अतिताण घेऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याचे टाळावे

आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here