सर्व गुण संपन्न तू
सकल क्षेत्री व्याप्ती
सार्थक बौद्धधर्मीय
तथागताची रे शक्ती
जाळले मनूस्मृतीला
अंधत्व श्रध्दा मुक्ती
हाडाचे शिक्षक जरी
अखंडित ज्ञानप्राप्ती
भाकरी परी पुस्तका
अजब तुमची भक्ती
अर्थशास्त्रीय गणिती
सार्थ ठरवली उक्ती
महिला सबलीकरण
हवीयं कायदा सक्ती
बळीराजा सुखी हवा
आता कळतेआसक्ती
आपणासम राजकर्ते
सदैव बसवावे तख्ती
कितीकाय केले कार्य
प्रिय कामगारां प्रति
आंदोलना दिशा देती
जनसेवा उसळे रक्ती
संविधान खास ठेवा
दिला अतुल्य संपत्ती
आठवते तुझी मुर्ती
कधीही येता आपत्ती
दुजे कुणी ना जगती
बाबा रमाबाई दंपत्ती
जय भीम ..
मना मना एक नाव
महामानव भीमराव
दिक्षाभूमीचैत्यभूमी
बोलविते महू गाव
बाल मन सोसे घाव
सळसळे रक्तउठाव
निंदा अवहेलना ती
सवर्णाचे क्रूर डाव
भुके पेक्षाही पुस्तके
तया गोड होती हाव
घर जणूं वाचनालय
शिक्षणा साठी धाव
मंदीराच्या प्रवेशाने
हृदया घेतला ठाव
दूर दृष्टी निर्णायक
आगळा दिसे भाव
जिंकत सारे पडाव
तारू निघे भरधाव
इतिहासां खास नोंद
दिगंतरात गर्जे नाव
महिला सबलीकरण
आज जाणवे प्रभाव
कामगार सु संरक्षीत
सरे पिळवण दबाव
हवे होता बाबाआतां
सुटेना आमची हाव
कंठ जरी दाटलेला
जय भीम बोला राव
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..