जामखेड तालुका प्रतिनिधी – दि. ११एप्रिल रोजी भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व दादासाहेब रूपवते जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन व कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन बहुजन शिक्षण संघ ,मार्केट पब्लिकेशन व सुजात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी लॉन्स संगमनेर येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जामखेड येथील दिपक तुपेरे, बापुसाहेब ओहोळ,हरिभाऊ कदम, प्रकाश सदाफुले, नामदेव राळेभात,विठ्ठल ससाणे,गोकुळ गायकवाड,निशा निकाळजे मंदा घायतडक यांना सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्काराने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड .संघराज रुपवते यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.प्रल्हाद लोलेकर तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी व माजी आमदार लहू कानडे यांचे सह पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.