[ad_1]
.
यावर्षी उष्णतेचा पारा अतितीव्र होत असल्याने फळबाग उन्हाळ्यात जगवणे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले. यंदा तालुक्याच्या अनेक भागात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. त्यात आणखी भर उष्णतेची पडत असल्याने फळबागांचे संरक्षण करण्यासाठी पेपर कापड (क्राप कव्हर) म्हणून आच्छादन ठेवले जात आहे. पंरतु या पेपर कापडासाठी मोठा खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
नेवासे तालुक्यात यंदाही फळबाग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. डाळिंब, केळी, चिकू, संत्रा, पपई आदी फळबाग आहेत. यावर्षी तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. जास्त तापमानामुळे फळ खराब होऊ नये, यासाठी पेपर कापड किंवा साडीचा वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी बोअरवेल, विहीरीची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पेपर कापडासाठी मोठा खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र पुढे भाव काय मिळतील, यावर बागाचे गणित अवलंबून राहिल. फळबागांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पेपरचे अच्छादन करीत आहेत. अति उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबाच्या कळ्या गळून पडतात. यामुळे फळबागा जगवणे मुश्किल झाले. पाणी टंचाईने झाडे जगवण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. जर मे महिन्यात असेच तापमान राहिले, तर डाळिंब व इतर पिकांची परिस्थिती बिकट होईल, असे नेवासे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब दहातोंडे यांनी सांगितले.
[ad_2]