कोळी आळीत ‘आयुष्यमान आरोग्य शिबिर’ संपन्न

0

१५५ रुग्णांची तपासणी, मोफत औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन..

महाबळेश्वर प्रतिनिधी : नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, कोळी आळी येथे आज दिनांक १५/४/२०२५ रोजी ‘आयुष्यमान आरोग्य शिबिरा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.शिबिरामध्ये मधुमेह (शुगर), रक्तदाब (बीपी) यांसारख्या सामान्य आजारांच्या तपासणीसह इतर विविध आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लहान मुलांची आरोग्य तपासणी केली आणि संसर्गजन्य आजारांविषयी महत्त्वाची माहिती दिली. विशेषतः मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांना आहारासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता येईल.

या आरोग्य शिबिरात एकूण १५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजूंना शुगर आणि बीपीवरील आवश्यक औषधे तसेच इतर आजारांवरील औषधे मोफत वितरित करण्यात आली. यामुळे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यावयाची विशेष काळजी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उष्माघात टाळण्यासाठी काय करावे, पाणी किती प्यावे आणि आहाराची काळजी कशी घ्यावी याबद्दल उपयुक्त माहिती देण्यात आली.

यासोबतच, गरोदर मातांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आणि आरोग्य सेवांबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, जेणेकरून सर्वांना आरोग्यविषयक माहिती आणि तपासणीचा लाभ घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here