[ad_1]
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीमुळे सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. याचा परिणाम शहरातील सराफा बाजारातही दिसून आला. सोमवारी (२१ एप्रिल) २४ कॅरेट सोन्याचे दर ९७,७०० रुपयांवर (३ टक्के जीएसटी वगळता) जीएसटीसह हे सोने खरेदी केल्यास त्याची किं
.
आंतरराष्ट्रीय उलाढालीचा सराफा बाजारपेठेवर परिणाम होत आहे. यामुळे गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ९१,२०० रुपये प्रतितोळा असलेले सोने साडेसहा हजारांनी वाढून ९७,७०० रुपये (३ टक्के जीएसटी वगळता) दरावर पोहोचले आहे, तर चांदीचा दर ९९,००० रुपये किलो झाला आहे.

सराफा बाजारात शुकशुकाट
सध्याच्या स्थितीत सोन्याचे दर वाढत आहेत. सोमवारी बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट दिसून आला. फक्त लग्नसराईच्या दोन टक्के ग्राहकांनीच सोने खरेदी केले. -विजय तिवारी, सराफा व्यापारी.
अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे सोन्याची दरवाढ
डोनाल्ड ट्रम्प यांनी आयुक्त शुल्क वाढवल्याचा परिणाम सराफा बाजारावर झाला आहे. पुढील दिवसांत सोन्याचे दर सव्वा लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. -राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष सराफा असोसिएशन. फक्त लग्नसराईची खरेदी
सराफा बाजारात दोन टक्के खरेदीदार फेब्रुवारी महिन्यापासून लग्नसराईला सुरुवात झाली आहे. तोंडावर अक्षय्य तृतीयेचा सण आहे. सध्याच्या काळात सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे. याचा परिणाम पाहता २ टक्के ग्राहक खरेदी करत आहेत. लग्नसराईच्या खरेदीत मणी मंगळसूत्र, टॉप्स, नेकलेस यांची खरेदी होत आहे. साखरपुड्यासाठी वधूसाठी २ ते अडीच ग्रॅम आणि वरासाठी ४ ग्रॅमपर्यंत अंगठ्या खरेदी होत आहेत. दुसरीकडे बँकामध्ये सोने तारणावर लोन देत असल्याने बाजारात मोड येत नाही. उलट ज्यांनी कमी भावात प्युअर सोने खरेदी केले होते, त्याचे लग्नासाठी दागिने खरेदी करत आहेत.
[ad_2]