[ad_1]
हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःव पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला ‘मराठी’ भाषा शिकण्याची गरज आहे, अशी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे. हिंदी सक्तीवरून मनसेने भाजपला प्रत्युत्तर दिले आ
.
भाजप आणि शिंदे गटाकडून मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जाताना दिसून येत होता. पण जसे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली असताना भाजपकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.मुंबईमध्ये मनसे आणि भाजपमध्ये बॅनरवॉर सुरू आहे. काल भाजपने राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात बॅनरबाजी करत मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मनसेच्या बॅनरवर नेमके काय?
हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे, अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःव पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला ‘मराठी’ भाषा शिकण्याची गरज आहे असे बॅनर लावत मनसेकडून भाजपला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भाजपच्या बॅनरवर संदेश काय?
भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर लिहण्यात आले आहे की, ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही तर भाषा जोडते असे भाजपचे बॅनर मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा असताना भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरेंचे वक्तव्य काय?
राज ठाकरे म्हणाले की, एकत्र येणे आणि एकत्र राहणे फार कठीण आहे असे मला वाटत नाही. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. हा माझ्या वैयक्तिक इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते की आपण महाराष्ट्राचे मोठे चित्र पाहिले पाहिजे. माझा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला पाहिजे.
मनसे – ठाकरे गटाच्या युतीवर बोलू नका- राज ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी टाळी देणार अशी चर्चा सुरू आहे. यात मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्या आहेत.
[ad_2]