[ad_1]
संग्राम थोपटे यांच्या रुपात भाजपला कोहिनूर हिरा मिळाल्याची भावना भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश करताना संग्राम थोपटेंनी कोणतीही अट ठेवली नाही. त्यांनी केवळ त्यांच्या मतदा
.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त भावना व्यक्त केली. तसेच काँग्रेसचा विदर्भातील एक बडा नेता मागील 4 दिवसांपासून आपल्याला फोन करून या घटनाक्रमाची माहिती घेत होता असा खुलासाही केला. विदर्भातील काँग्रेसचा एक नेता मागील 4 दिवसांपासून फोन करून माझ्याकडे संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाविषयीची विचारणा करत होता. संग्राम थोपटे खरेच तुमच्याकडे येत आहेत का? असे तो म्हणत होता. आज संग्राम थोपटे यांचा प्रवेश हा काँग्रेसचे पतन होण्यासाठीचा एक महत्त्वाचा दिवस आहे. काँग्रेस पक्ष लयाला जाणारा हा दिवस आहे.
आम्ही संग्राम थोपटे यांना भेटलो तेव्हा त्यांनी आमच्याकडे कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. मला काहीही नको, केवळ माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या रुपाने आपल्याला कोहिनूर हिरा भेटला आहे, असे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसमध्ये आचार, विचार काहीही उरले नाही
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने आज आचार, विचार, सत्व सर्वकाही सोडून दिले आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत. निवडणूक आयोग चुकीचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून आले तेव्हा आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. निवडणूक आयोगाकडे कोणतेही बोट दाखवले नाही. आम्ही केवळ महायुती पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
आम्ही मुख्यमंत्रिपदाचा विचार केव्हाही केला नाही. याऊलट काँग्रेसमध्ये या पदासाठी चढाओढ लागली होती. यासंबंधी महाविकास आघाडीत 8 बोर्ड लागले होते. याला कंटाळूनच संग्राम थोपटे आज आपल्यात आलेत.
बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेसमध्ये केवळ चापलुसीचे राजकारण सुरू असल्याचाही आरोप केला. काँग्रेसमध्ये सध्या केवळ चापलुसीचे राजकारण सुरू आहे. भाजपमध्ये असे नाही. आमच्याकडे माझ्यासारखा साधा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होतो. ही भाजपची संस्कृती आहे, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सध्या पोरकटपणा सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ अजून खूप लहान आहेत. त्यांना मोठा पल्ला गाठावा लागेल. पण त्यासाठी त्यांना पोरकटपणा सोडावा लागेल. मंत्रिमंडळाच्या चौंडी येथील बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली होती. त्यात दीड कोटी असा स्पष्ट उल्लेख होता. पण एका वर्तमान पत्राने शेवटच्या दोन शून्यापूर्वी असणारा टिंब अनावधानाने काढून टाकला. त्यामुळे ही ऑर्डर 150 कोटींची दिसली. वास्तविक ही सदर वर्तमानपत्राची तांत्रिक चूक आहे. पण सपकाळ यांनी सवंग लोकप्रियतेसाठी त्याचे राजकारण केले. मला त्यांची कीव येते, असे बावनकुळे म्हणाले.
[ad_2]