MLA Tayde conducted a surprise inspection at Chandur Bazaar; gave instructions to the officials | क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था: चांदूर बाजार येथे आमदार तायडे यांनी केली अचानक पाहणी; अधिकाऱ्यांना दिले सूचना – Amravati News

0

[ad_1]

चांदूर बाजार येथील तालुका क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था पाहून आमदार प्रवीण तायडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंगळवारी सकाळी त्यांनी क्रीडा संकुलाला अचानक भेट दिली.

.

क्रीडा संकुलाच्या पाहणीदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या. ट्रॅकवर पुरेसा प्रकाश नव्हता. शौचालये अस्वच्छ होती. परिसरही दुर्लक्षित अवस्थेत होता. या सर्व समस्यांबाबत आमदारांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

क्रीडा संकुलात अनेक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. मुलींसाठी चेंजिंग रूम नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मुलींसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत. पथदिवे आणि गोळा फेकीच्या सुविधाही अपुऱ्या आहेत. या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदारांनी दिले.

दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊनही तालुका क्रीडा संकुलात पुरेशा सुविधा नाहीत. क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील खेळाडूंना त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या काळात नोकरीसाठी शारीरिक सुदृढता महत्त्वाची असल्याने तरुणांचा कल मैदानी खेळांकडे वाढला आहे.

या पाहणीदरम्यान भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, ग्रामीण तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे, शहराध्यक्ष आनंद अहिर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here