[ad_1]
Unique Cricket Records: आयपीएलच्या प्रत्येक हंगामात फोर, सिक्सर्सचा पाऊस पाहायला मिळतो. बॅट्समन फॉर्मात असेल तर कठीण मॅचचा निकाल बदलवून टाकतात. फ्रँचायझींना त्यांच्या टीममध्ये पॉवर-हिटर शोधत असतात. आपल्या मर्जीप्रमाणे चेंडू सीमा ओलांडून सीमारेषेपार पाठवणाऱ्या बॅट्समन्सना आयपीएलमध्ये सर्वाधिक मागणी असते. अशाच फटकेबाज स्ट्रायकर्सवर फ्रांचायजीने खूप पैसे खर्च केले आहेत. आता जवळजवळ प्रत्येक टीममध्ये एकापेक्षा जास्त पॉवर हिटर आहेत. अशा बॅट्समन्सनी एका क्षणात सामना उलटवलाय. 2008 पासून आयपीएलमध्ये एका ओव्हरमध्ये 4 फलंदाजांनी 5 षटकार मारले. यामध्ये एकापेक्षा एक धडाकेबाज खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारे खेळाडू
युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. गेलने गेल्या काही वर्षांत त्याच्या बॅटने क्रिकेट मैदानात वर्चस्व गाजवलंय. तो जागतिक स्तरावर क्रिकेट बॉलच्या सर्वात धोकादायक स्ट्रायकर्सपैकी एक आहे. गेलने पुणे वॉरियर्स इंडियाच्या राहुल शर्माला एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारले होते. 2012 मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) टीमकडून पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध हा पराक्रम केला. त्या सामन्यात पहिल्याच चेंडूपासून गेल टॉप गियरमध्ये होता. आरसीबीच्या इनिंगमधील 13 वी ओव्हर होती आणि राहुल शर्माला चेंडू देण्यात आला. सौरभ तिवारीने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर ख्रिस गेलने राहुल शर्मावर हल्ला चढवला आणि सलग पाच सिक्सर मारले.
राहुल तेवतिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल सामना हा लीगच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय सामन्यांपैकी एक ठरला. 224 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरआरने 17 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या. त्यावेळी टीमला जिंकण्यासाठी 18 चेंडूंत 51 धावांची आवश्यकता होती आणि राहुल तेवतिया खूप स्ट्रगल करत होता. त्याने 23 चेंडूंत फक्त 17 धावा केल्या. आयपीएलमध्ये काही बॉल्समध्ये खेळाडू झिरो ते हिरो बनतात. तेवतियासोबतही असेच घडले. शेल्डन कॉट्रेलने टाकलेल्या 18 व्या ओव्हरने राहुल तेवतियाच्या कारकिर्दीला एक नवीन ओळख मिळवून दिली. त्याने डावखुरा वेगवान बॉलरला सलग 5 षटकार मारून खेळाचं रुपच पूर्णपणे बदलून टाकलं. यानंतर राजस्थानने हा सामना जिंकला.
रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजाने या खेळामुळे सर्वांनाच तोंडात बोटे घालायला भाग पाडले होते. त्याने आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये शानदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा डाव काही खास चालत नव्हता. शेवटच्या षटकापर्यंत जडेजा 21 चेंडूत 26 धावांवर होता. अचानक जडेजाने हर्षल पटेलच्या चेंडूवर 5 मोठे षटकार मारले. जडेजा 28 चेंडूत 62 धावांवर नाबाद राहिला. सीएसकेने 191 धावा केल्या. हर्षल पटेलची 19 वी ओव्हर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठकली. जडेजाने 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि त्याच्या टीमसाठी सामना जिंकला.
रिंकू सिंग
आयपीएल इतिहासातील आणखी एका संस्मरणीय सामन्यात 5 सिक्सर मारण्यात आले. हा कदाचित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय सामना असावा. 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या टीम अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने आल्या होत्या. त्यावेळी हा सामना केकेआरच्या आवाक्याबाहेर गेलाय असे वाटत होते. अचानक केकेआरला रिंकू सिंगच्या रूपात एक नवा हिरो मिळाला. त्याच सामन्यात रशीद खानच्या हॅटट्रिकनंतर रिंकू सिंगने जवळजवळ संपलेल्या सामन्यात जीव आणला. फलंदाजीसाठी येताच त्याने मैदानातील सर्व बॉलर्सना मारहाण करण्यास सुरुवात केली. शेवटच्या षटकात यश दयाल गोलंदाजी करण्यासाठी आला. केकेआरला जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. गुजरात विजयाच्या जवळ होता. त्यानंतर रिंकू सिंगने अकल्पनीय असे काहीतरी केले आणि सलग 5 सिक्सर मारले. साहजिकच केकेआरने सामना जिंकला. कारण या डावात रिंकूने फक्त 21 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या होत्या.
[ad_2]