पागोटे येथील एल अँड टी कंपनीच्या नोकर भरती वरून वाद विकोपाला

0

न्याय न मिळाल्यास पोलिसांनाच सहआरोपी करून कोर्टात दाद मागणार : सरपंच कुणाल पाटील

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे) : पागोटे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नव्याने कार्यरत झालेल्या एल अँड टी कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांची भरती न होता गावा बाहेरील इतर तरुणांची भरती केली गेली.त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने पागोटे गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणावर उपासमारीची वेळ आली आहे.बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय मिळावा. त्यांना नोकरी मिळावी या हेतूने सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायतचे सर्व पुरुष व स्त्री सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे.
त्या अनुषंगाने एल अँड टी कंपनीत गेले असता सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बाल बाल बचावले. तलवारी सारख्या धार धार शस्त्राने वार करण्यात येणार होता सुदैवाने सर्व जन बचावले.या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी उरण पोलीस ठाण्यात सदर प्राणघातक हल्ला करणारे व गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची भरती न करता इतर गावाबाहेरील व्यक्तींची भरती करणारे किरण पंडित, जितेंद्र पाटील, कुंदन पाटील, सौरभ पाटील, अतिश पाटील, संतोष पाटील, योगेश शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी पागोटे ग्रामपंचायत मध्ये पत्रकार परिषद घेऊन सदर घटनेची माहिती दिली व सदर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. धार धार शस्त्र बाळगल्या प्रकरणी प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्ती विरोधात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. कलम दाखल केला नाही. प्राणघातक हल्ला करणाऱ्या वर इतर कलम लावले.त्यामुळे आरोपी मोकाट सुटून परत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. आरोपी मोकाट सुटतील अशा प्रकारे त्यांच्यावर उरण पोलीस ठाणे मार्फत कलम लावल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली.

पागोटे ग्रामपंचायतीची गुरचरण जमीन सर्व्हे नंबर १८१/१/१ व १८१/१/२अशी असून सदरची जमीन ही कास्टींग यार्डच्या प्रकल्पाकरीता मेसर्स लार्सन अन्ड टुब्रो कंपनीला एम.एम.आर.डी.ए. यांनी दिली आहे. सदर कंपनीमध्ये स्थानिक गावक-यांना नोकरी व व्यवसायाकरिता प्राधान्य देण्यात यावे म्हणुन सरपंच व ग्रामपंचायत कमिटी व गावातील ग्रामस्थ मंडळ व्यवस्थापक एल. अँन्ड टी. कंपनीला दिनांक १०/०४/२०२५ रोजी श्री.गोपाल स्वरूप यांना पत्र दिले होते. त्यावेळी त्या ठिकाणी किरण हरीभाउ पंडीत राहणार पागोटे याने त्यावेळी सरपंच यांच्याशी वादविवाद करून शिवीगाळी व धमकी दिल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सदर दिवशी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने उरण पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा रजि. क्र. ६६१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३५२,३५१ (२), १८९(२),१९० अन्वये शिवीगाळ व प्राणघातक हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here