[ad_1]
काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात डोंबिवलीतील शिवमंदिर येथील मोक्षधाम मध्ये अत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश करीत टाहो फोडला. डो
.
डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात तिघांचेही पार्थिव नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी हजारो डोंबिवलीकरांनी भागशाळा मैदानात जमून मोने, लेले आणि जोशी यांना शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तान मुर्दाबाद – मुर्दाबाद,हिंदुस्तान जिंदाबाद- जिंदाबाद , भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण भागशाळा मैदान दणाणून सोडला.
डोंबिवलीकरांनी अत्यंदर्शन पूर्ण झाल्यानंतर साडे आठच्या दरम्यान तिन्ही पार्थिवांच्या अंत्ययात्रेला सुरूवात करण्यात येणार आहे. भागशाळा मैदानात नागरिकांना तिन्ही पार्थिवांचे एकत्रितपणे रांगेतून दर्शन घेता यावे यासाठी भागशाळा मैदानात पार्थिव ठेवण्यासाठी सजविलेला मंच, मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी झुंबड उडू नये यासाठी पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. तीन स्वतंत्र रथातून पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा खूपच गर्दी जमली होती. अंत्ययात्रा ते हजारो लोक सामील झाले होते.
पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
अतुल मोने यांच्या घराबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी काही सामान्य नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाज अशा घोषणा देत भारत सरकार आणि पाकिस्तानचा निषेध केला. सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याने आज असे भ्याड हल्ले होऊन सामान्य नागरिकांचा जीव जात आहे. सत्ताधारी राजकीय पक्ष फोडाफोडी करण्यात व्यस्त असल्याची संतप्त भावना यावेळी सामान्य नागरिकांनी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला.
सर्वपक्षीयांकडून उद्या डोंबिवली बंदची हाक
दहशतवादाच्या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाल्याने याच्या निषेधार्थ गुरुवारी सर्व पक्षीयांकडून डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे.
[ad_2]