[ad_1]
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्
.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करुन आपली गैरसोय टाळावी. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपल्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही भोसले यांनी सांगितले आहे.
वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १४८ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवार, ३० एप्रिल आणि शुक्रवार, २ मे २०२५ होणार आहे. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगाराच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. अधिक माहितीकरीता ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
[ad_2]