New action in fake school ID scam | बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात नवी कारवाई: दोन नवे आरोपी ताब्यात, संभाजीनगरच्या उपसंचालकांना नोटीस – Nagpur News

0

[ad_1]

नागपूर पोलिसांनी बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी दोघांना अटक केली आहे. सागर भगोले आणि शिवदास ढवळे या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक झाली आहे.

.

ढवळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत होते. भगोले एका शाळेत कर्मचारी असून तो पूर्णवेळ शिक्षण विभागाच्या वेतन पथकात मध्यस्थी म्हणून काम करत होता.

यापूर्वी या प्रकरणात शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील संस्थाचालक राजू मेश्राम यांनाही अटक करण्यात आली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१९ पासून बोगस प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सुमारे ५८० बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतनाची उचल करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली.

दरम्यान, संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील एका शाळेत दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचा आरोप आहे. मात्र त्या सध्या वैद्यकीय रजेवर आहेत.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here