[ad_1]
रस्त्याची कामे ५० टक्केही झाली नसताना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदाराला ती पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या रस्त्यांवर मुरुमाचे थर, खडी तर काही ठिकाणी कच्चा रस्ताच आ
.
जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत गंगापूर तालुक्यात ४ रस्त्यांचे डांबरीकरण व मजबूतीकरणाच्या कामात हा गैरव्यवहार झाला. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मान्यता मिळून फेब्रुवारी २०२५ मध्ये या कामांना सुरूवात झाली. महिनाभरात २६ मार्च रोजी ती पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता सुखदेव काकड आणि उपविभागीय अभियंता सातपुते यांनी बहाल केले.
कारवाई करा
कामे न करताच कम्प्लीशन देण्याचा प्रकार म्हणजे अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत दर्शविते. चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तर अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे.-दिलीप बनकर, संचालक, गंगापूर सहकारी साखर कारखाना
बनावट अहवाल दिला
कामे झाली नसताना ठेकेदाराने अंतिम बिल, रॉयल्टी स्टेटमेंट, खडी, डांबर, मुरूम वापरल्याचा अहवाल दिला. कार्यकारी व उपविभागीय अभियंत्यांनी रस्त्यांची पाहणी न करता थेट कम्प्लिशन दिले.
भ्रष्टाचार झालेला नाही
भ्रष्टाचार झाला नसून कागदोपत्री ३१ मार्चपूर्वी कामे झाल्याचे दाखवण्यासाठी कम्प्लिशन दिले. आता काम थांबवले आहे. – सुखदेव काकड, कार्यकारी अभियंता, जि.प.
निधी परत जात नाही
२०२-२३ चा निधी खर्चण्यासाठी जून २०२५ ची मुदत दिली. यंदाही वेळ मिळू शकतो. चुकीचे कम्प्लिशन देणाऱ्यांवर कारवाई करू. -अंकित, सीईओ, जिल्हा परिषद
[ad_2]