[ad_1]
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन हल्ला चढवला. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून, अनेक पर्यटक जखमी झाले आहेत.
.
दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याचा अमरावती जिल्हा वकील संघाने गुरूवारी २४ एप्रिलला निषेध नोंदवून जिल्हा कचेरीवर धडक दिली. या वेळी अमरावती जिल्हा वकील संघाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा देण्यात आले आहे. अमरावती
जिल्हा न्यायालयात गुरूवारी सकाळी अकरा वाजता अमरावती वकील संघाच्या कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येत वकील मंडळी एकत्र आलेत. त्यानंतर या हल्ल्यात बळी गेलेल्या सर्व निष्पाप पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येत वकीलांनी जिल्हाकचेरी गाठली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी निवेदनात नमुद केले कि, दहशतवाद्यांनी केलेल्या या नृशंस हत्याकांडाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध उर्वरित. पान ४
[ad_2]