Pakistani Cricketer blower Mohammad Amir wants to play IPL next season statement amid pahalgam attack | Pahalgam Terror Attack: ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला पुढच्या वर्षी खेळायचं आहे IPL मध्ये, पहलगाम हल्ल्यानंतर चर्चेत आलं वक्तव्य

0

[ad_1]

Pakistani players want to play in IPL : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे आणि त्यांनी शेजारील देशाविरुद्ध मोठे निर्णय घेतले आहेत. घडलेल्या घटनेनंतर आता  पाकिस्तानच्या एका माजी वेगवान गोलंदाजाच्या एका विधानाने लक्ष वेधले आहे. 

कोण आहे ‘हा’ खेळाडू?

पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (mohammad amir) एक विधान केलं आहे. त्याच्या या विधानाने लक्ष वेधले आहे. आमिरने इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोहम्मद आमिरची पत्नी नरजिस ही ब्रिटिश नागरिक आहे. यामुळेच  या गोलंदाजाला यूके पासपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. याचमुळे त्याच्यासाठी आयपीएलमध्ये खेळण्याचे दरवाजे उघडतील अशी चर्चा आहे. 

हे ही वाचा: सामन्यानंतर खेळाडू आपापसात काय बोलतात? IPL दरम्यान भुवनेश्वर कुमारने केला धक्कादायक खुलासा

 

काय म्हणाला मोहम्मद आमिर?

मोहम्मद आमिरने जिओ न्यूजला सांगितले की, “खरं सांगायचं तर, जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच आयपीएलमध्ये (IPL) खेळेन.  मी हे उघडपणे सांगत आहे. पण जर मला संधी मिळाली नाही तर मी पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळेन. पुढच्या वर्षी मी आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र होईन. जर संधी मिळाली तर का नाही? मी आयपीएलमध्ये खेळेन.”

हे ही वाचा: शाकाहारी असूनही विराट कोहली खातो ‘हे’ खास मांस… ते काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

तो पुढे म्हणाला, ” जर माझी पाकिस्तान सुपर लीगसाठी प्रथम निवड झाली तर मी आयपीएल खेळू शकणार नाही कारण मला पीएसएलमधून बंदी घातली जाईल. जर मला आयपीएलमध्ये प्रथम निवडले गेले तर मी त्या लीगमधूनही बाहेर पडू शकणार नाही.” 

हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर… अंपायरलाच सुनावले, ‘हे’ ठरले पराभवाचे कारण? Video Viral

मोहम्मद आमिरने करियर 

मोहम्मद आमिरने 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 62 T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्याने कसोटीत 119, एकदिवसीय सामन्यात 81आणि T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 71 विकेट्स घेतल्या. 2010 मध्ये पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान स्पॉट फिक्सिंगसाठी आमिरला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये आयसीसीने आमिरवर लादलेली बंदी वेळेपूर्वीच उठवली. सध्या आमिर पाकिस्तान सुपर लीगच्या सिजनमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून भाग घेत आहे.

 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here