बाजार समितीच्या सभापती पदी विश्वास दाभाडे तर उपसभापती पदी संदीप राऊत यांची शनिवार रोजी बिनविरोध करण्यात आली. सभापती, उपसभापती पदाची घोषणा होताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती विश्वास दाभाड
.
विश्वास दाभाडे यांना सभापती पदासाठी संचालक केशवराव तायडे यांनी सूचक तर नंदकिशोर सहारे यांनी अनुमोदन दिले. तसेच संदीप राऊत यांना उपसभापती पदासाठी दामोधर गव्हाणे यांनी सूचक तर सतीश ताठे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व संचालक मंडळाला मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने समन्वयातून काम करावे असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले. सभापती , उपसभापती पदासाठी एक वर्षाचा फार्मूला ठरविण्यात आला यामुळे ५ वर्षात १० जणांना सभापती, उपसभापती पदावर काम करण्यासाठी संधी मिळेल.सिल्लोड तालुक्यातील आमठाणा आणि सोयगाव तालुक्यातील घानेगाव येथे उपबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक कारवाई करा. बाजार समितीच्या आवारात पायाभूत – मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, माजी सभापती केशवराव पा. तायडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, प्रभाकर काळे, सुदर्शन अग्रवाल, तालुकाप्रमुख मारोती पा. वराडे, शहरप्रमुख मनोज झंवर, नंदकिशोर सहारे, श्रीरंग पा. साळवे, भावराव लोखंडे, शेख जावेद यांच्यासह रऊफ बागवान,सुधाकर पाटील, कौतीकराव मोरे, राजू गौर, ज्ञानेश्वर जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.