Vaibhav Suryavanshi : सोमवारी आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (RR VS GT) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरातवर 8 विकेट्स आणि जवळपास 5 ओव्हर राखून विजय मिळवला. यात राजस्थानकडून खेळणारे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी (vaibhav suryavanshi) हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले. यशस्वीने 70 धावा तर 14 वर्षांच्या वैभवने 35 बॉलमध्ये शतक ठोकले. वैभव हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. वैभवच्या या खेळीनंतर त्याचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे, असे असतानाच आता त्याच्या आई वडिलांची सुद्धा पहिली प्रतिक्रिया समोर आलीये.
वडील संजीव सूर्यवंशींनी दिली प्रतिक्रिया :
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाच्या रेकॉर्ड ब्रेक शतकावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘वैभवने आयपीएल सामन्यात केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकून आपली टीम राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या कामगिरीसाठी आम्ही खूप खुश आहोत. आमच्या सोबतच संपूर्ण बिहार, आमचा जिल्हा आणि देश वैभवच्या या दमदार खेळीवर आनंद व्यक्त करत आहेत. वैभवच्या या कामगिरीसाठी आम्ही राजस्थान रॉयल्सच्या संपूर्ण मॅनेजमेंटचे आणि खेळाडूंचे आभार मानू इच्छितो.
मागील तीन ते चार महिन्यांपासून राजस्थान रॉयल्सने वैभवला त्यांच्याकडे ठेवले होते आणि त्याला अतिशय उत्तम प्रकारे कोचिंग आणि ट्रेनिंग देण्यात आली. हेड कोच राहुल द्रविड, बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि इतर कोच मिळून वैभवचा खेळ सुधारत होते आणि वैभव सुद्धा खूप मेहनत करत होता. याचाच परिणाम आहे की तो खूप चांगला खेळतोय. यासोबतच त्यांनी बिहार क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानले कि त्यांनी खूपच कमी वयात वैभवला बिहार टीमकडून खेळण्याची संधी दिली. त्यामुळेच वैभव आज चांगला खेळून या उंचीवर पोहोचलाय.
Rajasthan Royals’ newest batting sensation, Vaibhav Suryavanshi, created history on Monday by becoming the youngest batter ever to score an IPL century at just 14 years and 32 days. Here’s what his father, Sanjeev Suryavanshi, said:
Vaibhav scored a century in just 35pic.twitter.com/1WHK83N87e
Press Trust of India (PTI_News) April 29, 2025
हेही वाचा : IPL 2025 मध्ये सेंच्युरी ठोकणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कोणत्या वर्गात शिकतो? काय आहे शाळेचं नाव?
फक्त 35 बॉलमध्ये ठोकलं शतक :
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने गुजरात विरुद्ध फलंदाजी करताना 35 बॉलमध्ये शतक ठोकलं. यासह तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला. वैभवने 38 बॉलमध्ये 101 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 11 षटकार ठोकले. वैभव सूर्यवंशीने त्याचा आयपीएल 2025 मधील पदार्पणाचा सामना हा 19 एप्रिल रोजी लखनऊ विरुद्ध खेळला. पहिल्या सामन्यात त्याने 20 बॉलमध्ये 34 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा खेळाडू सुद्धा ठरला. IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यावर 1.10 कोटींची बोली लावून करारबद्ध केले.