[ad_1]
Cricket Record With Maximum Runs In One Over: आयपीएल 2025 ची स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अगदी 111 सारखी सर्वात कमी धावसंख्या उभारुनही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकल्याचं पाहायला मिळालं आहे. तर दुसरीकडे 240 हून अधिकची धावसंख्याही दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने यशस्वीपणे गाठल्याचंही दिसून आलं आहे. या रेकॉर्ड ब्रेकिंग स्पर्धेचे कोट्यवधी चाहते रोज या स्पर्धेतील सामने पाहतात. मात्र आज आपण इथे असा एका विक्रमाबद्दल बोलणार आहोत ज्यासमोर आयपीएलचे सर्वच विक्रम अगदी साधे वाटू शकतात. या विक्रमाची आकडेवारी ऐकून क्रिकेटच्या जाणकारांनाही धक्का बसल्याशिवाय राहत नाही कारण इथं अवघ्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांनी 94 धावा केलेल्या.
एका ओव्हरमध्ये 77 धावा
एका ओव्हरमध्ये सर्व षटकार मारले तर जास्तीत जास्त 36 धावा करता येतात. एखादा बॉल नो वगैरे पडला तर 36 पेक्षाही अधिक धावा करता येतात. मात्र एकाच ओव्हरमध्ये 36 पेक्षाही अधिक धावा झाल्या तर त्यावर विश्वास ठेवणं सहज शक्य होणार नाही. मात्र खरोखर असं झालं होतं जेव्हा एका ओव्हरमध्ये 77 धावा काढण्यात आलेल्या. या ओव्हरमध्ये 8 षटकार आणि 6 चौकार पाहायला मिळालेले. एका प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यामध्ये केवळ 2 ओव्हरमध्ये 94 धावा कुटण्यात आल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती.
कोण होता गोलंदाज आणि फलंदाज?
हा प्रकार 1990 साली घडला होता. क्राइस्ट चर्चेमध्ये कँटरबरी आणि वेलिंग्टनच्या संघादरम्यान प्रथम श्रेणी दर्जाचा सामना खेळवण्यात आलेला. शेल ट्रॉफी स्पर्धेतील या सामन्यामध्ये शेटवच्या दिवशी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये कँटरबरीच्या संघाला जिंकण्यासाठी 95 धावांची गरज होती. सर्वांनाच आता हा सामना कँटरबरीच्या हातून निसटला असून वेलिंग्टन सामना जिंकणार असं वाटत होतं. मात्र एका ओव्हरमुळे सापना पालटला. दबावाखाली गोलंदाजी करणारा वेलिंग्टनचा गोलंदाज बर्ट वेंन्सने एका ओव्हरमध्ये तब्बल 22 बॉल टाकले. त्यामध्ये 17 नो बॉलचा समावेश होता. या ओव्हरमध्ये फलंदाजांनी तब्बल 77 धावा केल्या. ज्यात 8 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
एक धाव कमी पडली अन्…
कँटरबरीचा फलंदाज ली जर्मनने 22 बॉलमध्ये 70 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये संघाला जिंकण्यासाठी केवळ 18 धावांची गरज राहिली. मात्र दोन्ही पलंदाजांना केवळ 17 धावा करता आल्याने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 95 ऐवजी 94 धावा झाल्या आणि सामना अनिर्णित राहिला. फलंदाजांनी मोठे फटके मारावेत आणि त्या नादात ते बाद व्हावेत या हेतूने वेंसला गोंलादाजी दिल्याचं कर्णधाराने सामन्यानंतर सांगितलं. मात्र हा डाव वेलिंग्टनच्या संघावरच पलटला होता.
[ad_2]