[ad_1]
मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्नशील रहा. खेळात हारजीत पेक्षा सहभाग व लढत महत्त्वाची असते. उत्तम यशस्वी खेळाडू होण्यासाठी मनापासून इच्छाशक्ती बाळगून सराव करा, असे यशाचे मंत्र ज्येष्ठ क्रीडा समीक्षक पत्रकार संदीप चव्हाण यांनी दिला. स
.
प्रा. मोडक म्हणाले, सारडा महाविद्यालयाचा क्रीडा विभाग समृद्ध आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू महाविद्यालयातून घडले आहेत. खेळाडू खुप चमकदार कामगिरी करत असल्याने उद्या तुमच्यातील कोणीतरी शिवछत्रपती पुरस्कार मिळवतील याची खात्री आहे.कार्याध्यक्ष डॉ.रमेश झरकर म्हणाले, महाविद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक योग्य मार्गदर्शन करत असल्याने विद्यार्थी विविध खेळांमध्ये तरबेज झाले आहेत. ज्या महाविद्यालयातील मैदाने खेळाडूंनी गजबजलेले असते ते महाविद्यालय संपन्न असते.
डॉ.पारस कोठारी म्हणाले, सारडा महाविद्यालयाच्या प्रणिती सोमण व सानिया शेख या दोन विद्यार्थींनी मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घातली आहे. ही मोठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना सर्व क्रीडा प्रकारांसाठी महाविद्यालयातून सर्व सुविधांसह योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
महाविद्यालयाचे वरिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संजय धोपावकर व कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. संजय साठे यांनी क्रीडा विभागाचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी, सुत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी, तर आभार प्रा.साईनाथ थोरात यांनी मानले.
सानिया शेख हिला स्टॅंडिंग ऑनर या समारंभात सारडा महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया शेख हिला क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करून तिला स्टॅंडिंग ऑनर देण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत यशस्वी झालेल्या महाविद्यालयातील खेळाडूंना शिष्यवृत्ती, राष्ट्रीय स्तरावर विजेत्यांना ब्लेझर, ट्रॅकसूट तसेच स्पोर्ट्स शूज व मोमेंटो देवून सन्मानित आले.
[ad_2]