[ad_1]
Eye Health Issues During Summer: एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यातील काही भागात तापमाना थेट 45 अंशापर्यंत गेले आहे. उन्हाच्या काहिलीमुळं उष्माघात, उन्हाळी लागणे यासारखे आजार पाठी लागत आहेत. अशातच वाढत्या तापमानामुळं नेत्रसंसर्गाचा धोकादेखील वाढतो आहे. डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.
वाढत्या तापमानामुळं डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब आणि त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळं डोळ्यातील बुब्बुळ कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. उन्हात बाहेर पडताना चष्मा, गॉगल किंवा टोपी घालून घराबाहेर पडावे, असं अवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
राज्यामध्ये सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे उलट्या, जुलाब आणि त्वचाविकारांचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम डोळ्यावरही होत आहे. डोळ्यांची जळजळ होणे, अशा तक्रारीदेखील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काय काळजी घ्याल
उन्हात बाहेर जाताना गॉगल्स आणि टोपी घालावी- अधूनमधून डोळ्यावर थंड पाणी मारावे
– कामाच्या दरम्यान अधूनमधून ३ ते ५ मिनिटे डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या
– डोळ्यात कोरडेपणा जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स घालावे
पावासाळी आजार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज
मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार असून, प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, खासगी दवाखाने व रुग्णालयातील डॉक्टर, तसेच बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा अधिकारी व कामगार यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच खासगी रुग्णालये, दवाखाने यांच्या सहभागातून रुग्णांचा शोध घेणे, आजाराचे निदान करण्यापासून संपूर्ण उपचार देऊन रुग्ण बरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
[ad_2]