[ad_1]
संतांचा प्रपंच म्हणजे ईश्वराकडे वैश्विक कल्याणाची प्रार्थना असते. परमार्थात कायमचे परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे. सद्गुरु शंकर महाराजांचे कार्य हाच भक्ती व शक्तीचा अनोखा संगम आहे. अनेक लीला रचत त्यांनी साधकांना कल्याणाचा मार्ग दाखवला. संतांनी जात
.
येथील शंकर महाराज मठातील शंकर महाराज यांच्या मूर्ती स्थापना वर्धापन दिन व मठाधिपती माधव बाबा यांचा अभिष्टचिंतन सोहळा असा कार्यक्रम शंकर महाराज भक्त मंडळ, माधव बाबा भक्त मंडळ, ताराबाई बंग प्रतिष्ठान व रामनाथ बंग मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कालिकादेवी मंगल कार्यालयात झाला. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे मंगेश ओझा, जालिंदर तारळकर व न्यायाधीश वैजयंती राऊत, कालभैरवनाथ मठाचे अध्यक्ष दादा मर्दाने, अमोल सोळसे आदी उपस्थित होते.
मुथा महाराज म्हणाले, हिंदू धर्मात संत परंपरा, अवतार कार्यातून धर्म जागरण, परंपरा व साधना परंपरांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. स्वामी समर्थांनंतर अवलिया परंपरेतील व दत्त संप्रदायाचे म्हणून शंकर महाराजांकडे पाहिले जाते. कर्मकांडा पेक्षा भक्ती मार्ग व त्यापेक्षा नामस्मरणातूनही इश कृपा लवकर साध्य होते, अशी शिकवण दिली.
पाथर्डी तालुका नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाच्या वाटेवरून चालणारा तालुका आहे. शिर्डीचे साईबाबा, संत कविदास गणू ,शंकर महाराज यासह समकालीन अनेक संत महंतांचे वास्तव्य तालुक्यात झाले आहे.
ईश्वरी आराधना याच साधनेच्या सरळ मार्गातून अनन्य भावाने परमेश्वराला शरण जा. धर्म जागवा, तो आपले रक्षण करेन. धर्माशिवाय जगणे म्हणजे पशुतुल्य असून प्रत्येक कृतीला धर्माचे अधिष्ठान देऊनच परिवर्तन घडले तरच ते शाश्वत होईल. तालुक्यात माधव बाबांचे कार्य व जीवनशैली हाच एक धर्मग्रंथ आहे. सद्यस्थितीत वाचेवर सिद्धत्व प्राप्त झाल्याने त्यांची आध्यात्मिक उंची तालुक्याच्या धार्मिक वर्तुळाचे महात्म्य वाढवणारी ठरत आहे.
पाथर्डीचा मठ अशा सर्व सकारात्मक चळवळींचा केंद्रबिंदू ठरवून लोकोपयोगी कार्य आणखी प्रभावीपणे करण्यासाठी या कार्याला लोक चळवळीचे स्वरूप यावे, असे महाराज म्हणाले.स्वागत योगेश कलंत्री यांनी, प्रास्ताविक सचिन मुनोत यांनी,सूत्रसंचालन शंकर पंडित यांनी, तर आभार मुख्य संयोजक रामनाथ बंग यांनी मानले.
जातीभेद विसरून देशासाठी एका झेंड्याखाली एकत्र या अहंकार, स्वार्थ असे विविध विकार बाजूला ठेवा. सध्या समाजाच्या मजबूत बांधणीसाठी छत्रपतींची शक्ती व तुकोबाची भक्ती आवश्यक आहे. धर्मावर जागतिक पातळीवरून होणारे आक्रमण थोपवण्याची शक्ती परमेश्वराकडे मागा. धर्म हाच जगण्याचा शाश्वत आधार असून जातीभेद विसरून एका झेंड्याखाली व एक देशासाठी एकत्र या. सध्या देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने जातीभेद घडवून अराजकता माजवत हिंदूंना कमकुवत बनवण्याचे षडयंत्र मोडून काढायचे असेल तर संत विचार व नि:स्वार्थ भाव मनात ठेवूनच काम करावे लागेल, असे मुथा महाराज म्हणाले.
[ad_2]