[ad_1]
मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी लालटाकी येथील वैष्णव मातेचे मंदिर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्या
.
शहरातील सर्वाधिक रहदारी पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्ता लवकर खुला करण्यासाठी नियोजन करून उर्वरित कामे पूर्ण करा, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या. त्यांनी सर्व रस्त्यांचा कामाचा आढावा घेतला. या रस्त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी १६.२९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लालटाकी येथील श्री वैष्णव माता मंदिर नागरिक व मंदिराच्या विश्वस्तांच्या सहकार्याने स्थलांतरित केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही. हा रस्ता २४ फूट रुंद आहे. काँक्रिटीकरण झाल्याने वाहनांचा वेगही वाढणार आहे.
रस्ते रुंद व्हावेत, कामाला गती यावी म्हणून शहरातील आणखी दोन मंदिराचे स्थलांतर केले जाईल. यात वारुळाचा मारुती कमान येथील मुंजोबा मंदिर व जिल्हा रुग्णालय येथील महालक्ष्मी मंदिर तेथील नागरिकांच्या सहकार्याने स्थलांतरित करण्यात येणार आहे. ही दोन्ही मंदिरे स्थलांतरीत झाल्यानंतर मार्ग रुंद होऊन, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
^ शहरातील २४ प्रमुख रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी १३ रस्त्यांची कामे पूर्ण होत आली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जातील. सर्व रस्त्यांची कामे होण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागू शकतो. यशवंत डांगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक
एकविरा चौक ते पारिजात चौक रस्त्याचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत चालणार उपनगरातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या एकविरा चौक ते पारिजात चौक दरम्यान रस्त्याचे काम मंगळवार रात्रीपासून सुरू झाले आहे. पारिजात चौकाकडून एकविरा चौकाकडे येणारा एकेरी रस्ता बहुतांशी ठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना शॉर्टकट मार्ग पाहावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरच सकाळी भाजी बाजार भरतो. हे काम पुढचे सहा महिने सुरू राहणार आहे. ऐन पावसाळ्यात रस्ता कामासाठी बंद होणार असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
[ad_2]