Congress Mp Varsha Gaikwad Criticizes Ashish Shelar’s Barcelona Tour | मंत्री आशिष शेलार यांचा बार्सिलोना दौरा चर्चेत: राज्याच्या तिजोरीत खणखणाट असताना पैसा का वाया घालवायचा? काँग्रेसचा प्रश्न – Mumbai News

0

[ad_1]

भारतीय जनता पक्षाचे मंत्री आशिष शेलार हे सध्या बार्सिलोना मध्ये आयोजित प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी जात आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यावर करदात्यांचा पैसा वाया काय घालायचा? असा प्रश्न काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या

.

या संदर्भात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मंत्री आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी आशिष शेलार या प्रदर्शनातून आल्यानंतर काय घेऊन आलेत? त्याचा फायदा काय? याबाबत माहिती देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एकीकडे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. योजना सुरळीत राबवता येत नाही. राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे. यात असाच करदात्यांचा पैसा वाया का घालवायचा? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

वर्षा गायकवाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

अबब.. बार्सिलोना येण्या-जाण्याचा खर्च ७० लाख… सत्ताधारी पक्षातील आयटी मंत्री आशिष शेलार हे आपल्या दोन अधिकाऱ्यांसह बार्सिलोना शहरात आयोजित Solutions World Congress and Barcelona Cyber Security Congress 2025 या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी गेलेत. परंतु करदात्यांचे तब्बल ७० लाख रुपये खर्चून हा दौरा नियोजित करण्यात आलाय. या दौऱ्यासाठी खरंच एवढा अमाप खर्च येणार आहे का? प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च याचा पटणारा हिशोब सरकारनं सादर करावा.

या दौऱ्यासंदर्भातील माहिती कळताच जनतेला सुद्धा प्रश्न पडलाय की, इकडे जनतेला दिलेले शब्द पाळता येत नाहीत, दिलेल्या योजना सुरळीत राबवता नाहीत.. का तर, राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे.. त्यात दौरे करताना का उगीचचा करदात्यांचा अधिकचा पैसा वाया घालवायचा?

असो.. मंत्री महोदय दौऱ्यावरून आल्यानंतर प्रदर्शनाशी संबंधित सविस्तर अहवाल आणि आपल्या राज्याच्या गतिमान विकासाच्या दृष्टीकोनातून काय त्या प्रदर्शनातून घेऊन आलेत, त्याचा फायदा काय? याबाबत ते माहिती देतील, अशी अपेक्षा आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here