[ad_1]
भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव दरम्यान केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विरोधकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. युद्धात आपला शत्रू पाकिस्तान असला तरी आपण दोघांशी लढत होतो, अशा शब्दात भाजपने विरोधकांवर टीका
.
भारतीय जनता पक्षाचे नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर टीका करत भारतीय सैनिकांचे आणि भारताच्या झालेल्या विजयाचे कौतुक केले आहे. आपण युद्धातही जिंकलो आणि तहातही जिंकलो, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कणखर घोषणेचा उल्लेख केला आहे.
केशव उपाध्ये यांनी केलेली पोस्ट देखील पहा….
युद्धात जिंकलो, तहातही जिंकलो… जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध भारतीयांचा मृत्यू झाला. निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आलं. याचे प्रत्युत्तर म्हणून भारत आणि पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील मुख्यत: बहावलपूर येथील दहशतवाद्यांचे तळ हवाई हल्ल्याने उडवले ज्यामध्ये 4 प्रमुख दहशतवादी संघटनांचे हेडक्वार्टर उध्वस्त झाले. वास्तविक पाहता भारताचा हल्ला एवढा अचूक होता की, दहशतवादी तळ सोडून इतर कोणत्याही ठिकाणी (जे सहज शक्य होतं) हल्ला केला नाही. मात्र या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला केला. भारतीय सेनेने यावर उत्तर म्हणून पाकिस्तानच्या विविध ठिकाणी असलेल्या मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर वर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यांची तीव्रता एवढी होती, की तिसऱ्याच दिवशी शस्त्र संधीचा प्रस्ताव पाकिस्तान कडून देण्यात आला. मात्र तोवर भारत आणि शंभर एक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (ज्यात कंधार विमान अपहरणातील आरोपीही आहे) ठार केले. याशिवाय यापूर्वीच हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने सिंधू नदी करार इतिहासजमा केला, जो शस्त्र संधीसाठीच्या भारताच्या अटींमध्ये आहे. याचप्रमाणे यापुढे केलेली दहशतवादी कारवाई, ऍक्ट ऑफ वॉर मानली जाईल, असे सगळ्या जगासमोर ठणकावून सांगितले आहे. याशिवाय भारताची एअर डिफेन्स सिस्टीम किती मजबूत आहे समजलेच; मात्र पाकिस्तानच्या एअर सिस्टीमचा पुरता अंदाज आपल्याला आला. कारण आपल्या S-400 समोर 80% हून अधिक ड्रोन पाकिस्तानची सीमाही पार करू शकले नाहीत. शिवाय कश्मीर प्रश्नावर भारताची कोणतीही तडजोडीची भूमिका नाहीये, आणि कधीच नसेल हे जगासमोर अधोरेखित झाले आहे. आणि या सगळ्यावर कळस म्हणून पाकिस्तानने आता ‘गोळी’ चालवली, तर आम्ही ‘गोळा’ चालवू, अशी घोषणाच देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे. या युद्धा दरम्यान शत्रू फक्त पाकिस्तान असला, तरी आपण दोघांशी लढत होतो, ते म्हणजे युद्धा दरम्यानही सरकारच्या भूमिकेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे. कोणत्याही देशाचे सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचे असो राष्ट्राच्या संरक्षणासाठी शंभर टक्के प्रयत्न करते. आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन सरकारने देशहिताचीच भूमिका घेतलेली असते, आणि आपण नागरिक म्हणून त्या भूमिकेशी 100% सहमत असणे आवश्यक असते. युद्धविराम झाला असला, तरी झालेल्या युद्धात, तहात, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांना ठणकावून सांगण्यात आणि सर्वच बाबतीत भारत जिंकला आहे, हे नक्की.
[ad_2]